पाच गोवंश कत्तलीसाठी नेते होते; शेगावमध्ये तिघांना पकडले

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः टाटा एसी वाहनात गोवंशाला कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या तिघांना शेगाव शहर पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून ५ गोवंशांची सुटका करण्यात आली. ही कारवाई आज, ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शेगाव -अकोट रोडवरील उड्डाणपुलाजवळ करण्यात आली. टाटा एसी वाहनात (क्र. एमएच ४३ एडी ८९६६) अवैधरित्या गोवंश कोंबून कत्तलीसाठी नेण्यात …
 
पाच गोवंश कत्तलीसाठी नेते होते; शेगावमध्ये तिघांना पकडले

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः टाटा एसी वाहनात गोवंशाला कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या तिघांना शेगाव शहर पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून ५ गोवंशांची सुटका करण्यात आली. ही कारवाई आज, ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शेगाव -अकोट रोडवरील उड्डाणपुलाजवळ करण्यात आली.

टाटा एसी वाहनात (क्र. एमएच ४३ एडी ८९६६) अवैधरित्या गोवंश कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती शेगाव शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी शेगाव अकोट -रोडवरील उड्डाणपुलाजळ वाहनाची तपासणी केली असता त्यात ५ गोऱ्हे निर्दयीपणे बांधले असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांची सुटका करून देखरेखीसाठी शेगावच्या श्रीकृष्ण गोरक्षणाच्या सुपूर्द केले. आरोपींचे वाहन जप्त केले असून, अकील बेग गुशनबेत (५५), शकिलुद्दीन वकिलुद्दीन (५०, दोघे रा. हिवरखेड, ता. तेल्हारा जि. अकोला) व रामसिंग रामचंद्र मावस्कर (३५, रा. झिल्पी, ता. धारणी, जि. अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.