पाठलाग करायचा, छेड काढायचा… ती बरेच दिवस गप्प बसली… शेवटी तिचा संयम संपला…!; जळगाव जामोद शहरातील धक्‍कादायक घटना

जळगाव जामोद (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माझ्यासोबत बोलत जा असे म्हणून तरुणीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या व घरात एकटी पाहून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध जळगाव जामोद पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला. शुभम गजानन कपले (रा. सूर्यवंशीनगर, जळगाव जामोद) असे या तरुणाचे नाव आहे. शहरातीलच चौभारा चौक परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय तरुणीने …
 

जळगाव जामोद (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः माझ्यासोबत बोलत जा असे म्‍हणून तरुणीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या व घरात एकटी पाहून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध जळगाव जामोद पोलिसांनी आज गुन्‍हा दाखल केला.

शुभम गजानन कपले (रा. सूर्यवंशीनगर, जळगाव जामोद) असे या तरुणाचे नाव आहे. शहरातीलच चौभारा चौक परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय तरुणीने त्‍याच्‍याविरुद्ध तक्रार दिली आहे. क्‍लासेसला जाताना शुभम नेहमी तिचा वाईट उद्देशाने पाठलाग करत असे. त्‍याने तिला धमकी दिली की तू माझ्यासोबत बोलत जा अन्यथा तुला व तुझ्या घरच्यांना चाकूने जीवे मारेल. गेल्‍या महिन्‍यात 15 फेब्रुवारीला या तरुणाने आगळीकच केली. तरुणी घरात एकटी असल्‍याचे पाहून तिचा वाईट उद्देशाने हात पकडला. तरुणीने आरडाओरडा केल्यानेर तरुणीचे आई- वडील, मोठी बहीण यांच्यासह शेजारीही धावून आले. त्‍यांनी तिला तरुणाच्‍या ताब्‍यातून सोडवले. तरुणीने समाजात बदनामी होऊ नये म्हणून त्‍यावेळीही तक्रार दिली नव्‍हती. मात्र त्‍यानंतर त्‍याचा त्रास वाढतच चालल्याने अखेर तिने जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी शुभम कपलेविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास जळगाव जामोद पोलीस करत आहेत.