पाठलाग करून महिलेची दोघांनी ओढली ओढणी; शेगाव शहरातील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाठलाग करून विवाहितेच्या सलवारची ओढणी ओढून विनयभंग करण्यात आल्याची घटना शेगावमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी सुदामानगरातील 35 वर्षीय महिलेने काल शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.तिने तक्रारीत म्हटले आहे, की मी बचतगटाचे कागदपत्रे झेरॉक्स करण्यासाठी जात असताना शेख मेहबूब शेख मेहमूद (रा. सुदामानगर), शेख नदीम शेख मेहमूद (रा. …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाठलाग करून विवाहितेच्या सलवारची ओढणी ओढून विनयभंग करण्यात आल्याची घटना शेगावमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी सुदामानगरातील 35 वर्षीय महिलेने काल शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तिने तक्रारीत म्हटले आहे, की मी बचतगटाचे कागदपत्रे झेरॉक्स करण्यासाठी जात असताना शेख मेहबूब शेख मेहमूद (रा. सुदामानगर), शेख नदीम शेख मेहमूद (रा. व्यंकटेशनगर) यांनी पाठलाग करून अंगाला हात लावून सलवारची ओढणी ओढली व धक्का दिला. अश्‍लील भाषेत शिविगाळ करून विनयभंग केला. तपास शेगाव शहर पोलीस करत आहेत.