पाठलाग करून शाळकरी मुलीच्‍या घरात घुसला; विनयभंग, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग करण्यात आल्याची घटना बोरी आडगाव (ता. खामगाव) येथे काल, 17 जून रोजी दुपारी घडली. याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून करण किसन वाकोडे(21, रा. बोरी आडगाव) याच्याविरोधात खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित मुलगी काल दुपारी शाळेतून घरी परतत होती. त्यावेळी करण …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग करण्यात आल्याची घटना बोरी आडगाव (ता. खामगाव) येथे काल, 17 जून रोजी दुपारी घडली. याप्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून करण किसन वाकोडे(21, रा. बोरी आडगाव) याच्याविरोधात खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी काल दुपारी शाळेतून घरी परतत होती. त्यावेळी करण तिचा पाठलाग करत होता. ती घरी पोहोचल्यानंतर त्‍यानेही तिच्या घरात प्रवेश केला व घराची कडी लावून वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला व जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार मुलीने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.