पाठीवर “अल्लाह’ उमटलेल्या बोकडाकडून मालकाला १ कोटीची अपेक्षा!; आजपर्यंत ५१ लाखांची बोली!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या एका बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे. याला कारण ठरले ते बोकडाची भलीमोठी किंमत! चिखली तालुक्यातील करवंड येथील या राजबिंड्या टायगर नावाच्या बोकडाला याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. या बोकडावर आजवर ५१ लाख रुपयांची बोली लागली असून, मालकाला मात्र एक कोटी रुपयांची अपेक्षा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या एका बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे. याला कारण ठरले ते बोकडाची भलीमोठी किंमत! चिखली तालुक्यातील करवंड येथील या राजबिंड्या टायगर नावाच्या बोकडाला याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. या बोकडावर आजवर ५१ लाख रुपयांची बोली लागली असून, मालकाला मात्र एक कोटी रुपयांची अपेक्षा आहे.

करवंड (ता. चिखली) येथील समाधान चव्हाण ग्रामपंचायतीत शिपाई आहेत. तीन भावंडं मिळून दोन एकर शेती आहे. त्यामुळे मजुरी आणि शेळीपालनावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. श्री. चव्हाण यांना तीन मुले असून, दोघांचे शिक्षण सुरू आहे. एका गॅरेजवर कामाला जातो. मात्र अनेक वर्षे गरिबीत काढल्यानंतर श्री. चव्हाण यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येणार आहेत. ज्या बोकडावर ५१ लाख रुपयांपर्यंत बोली लागली त्याचे ते मालक आहेत. अडीच वर्षांचा हा उंचपुरा टायगर मोठं कपाळ आणि मजबूत बांध्याने शक्‍तीवान आहे.

दोन- तीन जण फक्त त्याला पकडण्यासाठी लागतात. या टायगरवर लाखोंची बोली लागण्याचं कारणच वेगळं आहे, ते म्हणजे याच्या पाठीवर जन्मतः “अल्लाह’ उमटलेलं आहे. त्यामुळे जाणकार असं सांगतात की ज्यांच्याकडे अशी जनावरं आढळतात त्यांना नशीबवान मानलं जातं. टायगर आठ महिन्यांचा असताना श्री. चव्हाण यांना त्याच्या पाठीवरील अक्षराबद्दल उर्दूतील जाणकारांनी सांगितलं. गेल्या वर्षीही त्याला २२ लाख रुपयांची बोली लागली होती. यावर्षीही त्याला ५१ लाख रुपयांची बोली लागली आहे. श्री चव्हाण यांना आता त्यांच्या बोकडावर एक कोटी रुपयांची बोली लागेल, अशी अपेक्षा आहे.