पाडळीच्‍या आरोग्‍य केंद्रातर्फे डेंग्‍यू, मलेरियाबद्दल जनजागृती

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाशी लढाई यशस्वी केल्यानंतर आता पाडळी (ता. बुलडाणा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पावसाळी आजार म्हटले जाणाऱ्या डेंग्यू, मलेरियापासून नागरिकांचे रक्षण करण्यास सज्ज झाले आहे. जिल्हा हिवताप अधिकारी श्री. चौहाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिवताप जनजागृती मोहीम राबवली जात आहे. मोहिमेत आरोग्य विषयक हस्तपत्रिकेचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाशी लढाई यशस्वी केल्यानंतर आता पाडळी (ता. बुलडाणा) येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्र पावसाळी आजार म्‍हटले जाणाऱ्या डेंग्‍यू, मलेरियापासून नागरिकांचे रक्षण करण्यास सज्‍ज झाले आहे. जिल्हा हिवताप अधिकारी श्री. चौहाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिवताप जनजागृती मोहीम राबवली जात आहे. मोहिमेत आरोग्य विषयक हस्तपत्रिकेचे वाटप करण्यात आले. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, पाणी साठे घट्ट झाकून ठेवण्याबाबत गावकऱ्यांना माहिती देण्यात आली. कंटेनर सर्वेक्षणही करण्यात आले. या वेळी आरोग्य सेवक प्रदीप चौधरी, उपसरपंच जयेश पवार व ग्रामस्थ, आशा सेविका श्रीमती वराडे व पवार यांची उपस्‍थिती होती.