पाणीटंचाई निवारण उधारीवर!; खर्च झाले सव्वा सहा कोटी, मिळाला खडकूही नाही!!; जिल्हा प्रशासन मागेना, राज्य शासन देईना!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाणीटंचाई निवारणासाठी जूनअखेर जिल्ह्यातील विविध उपाययोजनांवर एकदोन नव्हे तब्बल सव्वा सहा कोटी रुपये खर्ची झाले. मात्र शासनाकडून जिल्ह्याला त्यापोटी एक छदामदेखील मिळाला नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे. यामुळे कोट्यवधींच्या उपाययोजना उधारीवरच पूर्ण झाल्या वा सुरू असल्याचे मजेदार चित्र आहे. जून अखेरीस 349 टंचाईग्रस्त गावांत पाणी टंचाईचा मुकाबला करण्यासाठी …
 
पाणीटंचाई निवारण उधारीवर!; खर्च झाले सव्वा सहा कोटी, मिळाला खडकूही नाही!!; जिल्हा प्रशासन मागेना, राज्य शासन देईना!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पाणीटंचाई निवारणासाठी जूनअखेर जिल्ह्यातील विविध उपाययोजनांवर एकदोन नव्हे तब्बल सव्वा सहा कोटी रुपये खर्ची झाले. मात्र शासनाकडून जिल्ह्याला त्यापोटी एक छदामदेखील मिळाला नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे. यामुळे कोट्यवधींच्या उपाययोजना उधारीवरच पूर्ण झाल्या वा सुरू असल्याचे मजेदार चित्र आहे.

जून अखेरीस 349 टंचाईग्रस्त गावांत पाणी टंचाईचा मुकाबला करण्यासाठी 476 उपाययोजना करण्यात आल्या. यावरील खर्च 6 कोटी 26 लाख 51 हजारांवर गेला आहे. विंधन विहिरींवर 1 कोटी 35 लाख, नळ योजना दुरुस्तीवर 1 कोटी 29 लाख, खासगी विहीर अधिग्रहणावर 1 कोटी 24 लाख, तात्पुरत्या पूरक नळ योजनांवर 69 लाख तर टँकरवर सर्वाधिक म्हणजे 1 कोटी 70 लाख रुपये खर्ची झाले आहेत. मात्र जुलै महिना उलटला तरी मायबाप सरकारने जिल्ह्याला अजूनही कवडी सुद्धा दिले नाहीये! यामुळे यंत्रणासह सर्वच घटकांची पंचायत झाली आहे.