पाणी पिण्यासाठी गेलेल्या मेंढपाळाचा कालव्यात पडून मृत्यू; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या मेंढपाळाचा कालव्यात पडून मृत्यू झाला. ही घटना पिंप्री आंधळे (ता. देऊळगाव राजा) शिवारात गुरुवारी (दि. 18) घडली. कारभारी किसन शेळके वडाळा वळसा (ता. भोकरदन, जि. जालना) असे मेंढपाळाचे नाव आहे. काल सकाळी त्यांचा मृतदेह कालव्याबाहेर काढण्यात आला.कारभारी किसन शेळके, शंकर गुणाजी …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या मेंढपाळाचा कालव्यात पडून मृत्यू झाला. ही घटना पिंप्री आंधळे (ता. देऊळगाव राजा) शिवारात गुरुवारी (दि. 18) घडली. कारभारी किसन शेळके वडाळा वळसा (ता. भोकरदन, जि. जालना) असे मेंढपाळाचे नाव आहे. काल सकाळी त्यांचा मृतदेह कालव्याबाहेर काढण्यात आला.
कारभारी किसन शेळके, शंकर गुणाजी सोरमाळे हे मेंढपाळ अंढेरा, पिंप्री शिवारात मेंढ्या चारण्यासाठी आले होते. 18 फेब्रुवारीला दुपारी परिसरात वादळी वारा आणि गारपीट होत होती. त्या दरम्यानच कारभारी शेळके हे खडकपूर्णा कालव्यात पाणी पिण्यासाठी गेले होते. त्यातच पाय घसरून ते पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती सोबत असलेली शंकर सोरमारे यांनी पिंप्री गावातील नागरिकांना दिली. पिंप्री ग्रामस्थांनी घटनेची माहिती अंढेरा पोलिसांना दिली. लगेच अंढेरा पोलीस ठाण्याचे कैलास उगले, समाधान झिने यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह शोधायला सुरुवात केली. मात्र कालव्यात पाणी अधिक असल्याने आणि अंधार पडल्याने मृतदेह सापडत नव्हता. त्यामुळे कालव्याचे पाणी बंद करायचे सांगितल्यावर काल सकाळी 9 वा कालव्यात मृतदेह सापडला. याप्रकरणी मृतकाचे मामा प्रल्हाद विठोबा मतकर (रा. जाफराबाद ,जि. जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.