पाण्याच्‍या टाकीचे बांधकाम साहित्‍यच नेले चोरून; बुलडाण्यातील घटना

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाण्याच्या टाकीचे बांधकाम साहित्य चोरट्यांनी चोरून भंगारात विकले. ही घटना आज, 15 मार्चच्या सकाळी इकबालनगरात समोर आली. इकबालनगरात पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी मो. जमीन मो. कौसर (५३, रा. इकबालनगर) वॉचमेन आहेत. सकाळच्या सुमारास त्यांना झोप लागली असता चोरट्यांनी लोखंडी पाणी सोडण्याचा वाल (अंदाजे किंमत ११ हजार …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पाण्याच्‍या टाकीचे बांधकाम साहित्‍य चोरट्यांनी चोरून भंगारात विकले. ही घटना आज, 15 मार्चच्‍या सकाळी इकबालनगरात समोर आली.

इकबालनगरात पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी मो. जमीन मो. कौसर (५३, रा. इकबालनगर) वॉचमेन आहेत.  सकाळच्या सुमारास त्यांना झोप लागली असता चोरट्यांनी लोखंडी पाणी सोडण्याचा वाल (अंदाजे किंमत ११ हजार रुपये), लोखंडी गडर (वजन १ क्विंटल किंमत १० हजार  रुपये) असा एकूण २१ हजार रुपयांचा माल चोरून नेला. सकाळी उठल्‍यावर चोरी झाल्याचे लक्षात आल्याने वॉचमनने भंगारच्‍या दुकानात पाहणी केली. मनोज पातालबन्सी यांच्‍या भंगाराच्‍या दुकानात मनोजसह त्याचा मुलगा उमेश हे दोघे पाणी सोडण्याचा वाल तोडून कापून त्यास बारीक करताना दिसले. त्या दोघांचे फोटो काढून वॉचमनने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्‍यांच्‍या तक्रारीवरून मनोज पातालबन्सी व उमेश मनोज पातालबन्सी (दोघे रा. वॉर्ड क्र. २, परदेशीपुरा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  तपास एएसआय श्री. शिंदे करत आहेत.