पारनेरच्या वादात तहसीलदार संघटनेची उडी! महिला अधिकारी म्हणून श्रीमती देवरेंची अडवणूक; बुलडाण्यात अधिकाऱ्यांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती देवरे यांचे प्रकरण त्या जिल्ह्यातच नव्हे राज्यात गाजत असतानाच आता त्यात महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनाने उडी घेतली आहे. केवळ एक महिला अधिकारी म्हणून त्यांची हेतूपरस्सर अडवणूक करण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप संघटनेने केला असून, त्यासाठी जबाबदार लोक प्रतिनिधी …
 
पारनेरच्या वादात तहसीलदार संघटनेची उडी! महिला अधिकारी म्हणून श्रीमती देवरेंची अडवणूक; बुलडाण्यात अधिकाऱ्यांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती देवरे यांचे प्रकरण त्या जिल्ह्यातच नव्हे राज्यात गाजत असतानाच आता त्यात महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनाने उडी घेतली आहे. केवळ एक महिला अधिकारी म्हणून त्यांची हेतूपरस्सर अडवणूक करण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप संघटनेने केला असून, त्यासाठी जबाबदार लोक प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी संघटनेने केली आहे.

तहसीलदार देवरे यांच्या प्रकरणाने राज्यात गहजब उडवून दिला आहे. राजकीय, प्रशासकीय वर्तुळात यामुळे वादंग निर्माण झाले असून, विरोधकांनी प्रकरण उचलून धरले आहे, आमदार लंके यांनी प्रकरणी थेट अण्णा हजारे यांच्यापर्यंत प्रकरण नेल्याने प्रकरण पेटले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने श्रीमती देवरे यांना समर्थन देत त्यांची मुद्दाम अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांना निवेदन देऊन संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हाध्यक्ष आर. एन. देवकर, उपाध्यक्ष शिवाजी मगर, विजय पाटील, कोषाध्यक्ष रुपेश खंडारे यांच्यासह प्रवीण लटके, संजय गरकल, अजित येळे, सुनील आहेर, डी. एस. किटे, शिल्पा बोबडे, स्वप्नाली डोईफोडे, आशिष सानप, पंकज मगर, हेमंत पाटील यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.