पालकमंत्री डॉ. शिंगणेंनी केला जिल्हा कॅन्सरमुक्त करण्याचा निर्धार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जनजागृती, प्रतिबंध, निदान व उपचार अभियान राबविल्यास निश्चितच कॅन्सरवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. हीच बाब हेरून जिल्ह्यात अशा स्वरुपाचे अभियान राबवून जिल्हा कॅन्सरमुक्त करण्याचा निर्धार करावा, अशी सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी जिल्हा कॅन्सर मुक्त करण्याचा निश्चयही …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जनजागृती, प्रतिबंध, निदान व उपचार अभियान राबविल्यास निश्चितच कॅन्सरवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. हीच बाब हेरून जिल्ह्यात अशा स्वरुपाचे अभियान राबवून जिल्हा कॅन्सरमुक्त करण्याचा निर्धार करावा, अशी सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी जिल्हा कॅन्सर मुक्त करण्याचा निश्चयही व्यक्त केला.

बुलडाण्यातील शासकीय विश्रामगृहात त्‍यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, ब्रेस्टचा कॅन्सर होण्याची नेमकी कारणे व त्यावर कशाप्रकारे नियंत्रण मिळविता येऊ शकते, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्करोगासंदर्भात व्यापक जनजागृती केल्यास व याचे वेळीच निदान व उपचार झाल्यास आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो असा विश्वास कॅन्‍सर प्रकल्पाचे सल्लागार डॉ. नंदकुमार पानसे यांनी यावेळी व्यक्त केला. बैठकीला विजया दुलंगे, प्रदीप सोळुंके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. लाड, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ उपस्थित होते.