पालकमंत्री डॉ. शिंगणे यांचे आदेश… गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटखा विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातलेली असताना देखील मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गुटखा विक्री करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळा, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटखा विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातलेली असताना देखील मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गुटखा विक्री करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळा, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

विश्रामगृहात अमरावती विभागाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला सहआयुक्त एस. जी. अण्णापुरे, एस. डी. तेरकर, के. आर जयपूरकर, एस. डी. केदारे यांच्यासह विभागातील सर्व अन्न सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. यावेळी अमरावती विभागात केलेल्या कारवायांचा आढावा डॉ. शिंगणे यांनी घेतला. अमरावती, अकोला, बुलडाणा येथील गुटखा माफिया गुटख्याची तस्करी करून मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत. मध्यंतरी कोरोनामुळे याकडे विभागाचे दुर्लक्ष झाले. परंतु आता याकडे दुर्लक्ष होता कामा
नये. गुटखा माफियांच्या मुसक्या आवळा, अशी सूचना त्‍यांनी केली.

जनतेला हायजेनिक अन्न पदार्थ मिळावे यासाठी अन्न पदार्थ तपासण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. खवा, मिठाई यात प्रामुख्याने भेसळ होत असते. त्याची देखील तपासणी करण्यात यावी. काही व्यावसायिक खाद्यपदार्थ तळण्यासाठी एकाच तेलाचा वारंवार वापर करतात. तेलामध्ये तळलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यास ते शरीरासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे एकाच तेलाचा वारंवार वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी. किराणा दुकानाच्या देखील नियमित तपासण्या कराव्या. यामध्ये कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर यापुढे कारवाही करण्यात येईल, असा इशारा मंत्री डॉ. शिंगणे यांनी दिला.