पालकमंत्री डॉ. शिंगणे यांचे आदेश ः मुसळधार पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात काल रात्रीपासून अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. आज 7 सप्टेंबर रोजी सकाळी मुसळधार पावसाची व्याप्ती वाढली. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात नदी, नाल्यांना पूर आला असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी गेले आहे. परिणामी, त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र …
 
पालकमंत्री डॉ. शिंगणे यांचे आदेश ः मुसळधार पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात काल रात्रीपासून अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. आज 7 सप्टेंबर रोजी सकाळी मुसळधार पावसाची व्याप्ती वाढली. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात नदी, नाल्यांना पूर आला असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी गेले आहे. परिणामी, त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. बुलडाणा तालुक्यातील पाडळीसह काही गावे बाधित झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच त्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या.