पालकमंत्र्यांचे निर्देश ः रस्तेकामांना ब्रेक लावणारे भूसंपादन प्रश्‍न मार्गी लावा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात बर्याच रस्त्यांची कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहेत. त्यामधील काही रस्ते पूर्ण झाले आहेत, तर काहींचे काम सुरू आहेत. मात्र काही रस्ता कामात भूसंपादन, वन जमिनीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित यंत्रणांनी या रस्ता कामांमधील भूसंपादनाचे व वन जमिनीचे प्रश्न मार्गी लावावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात बर्‍याच रस्त्यांची कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहेत. त्यामधील काही रस्ते पूर्ण झाले आहेत, तर काहींचे काम सुरू आहेत. मात्र काही रस्ता कामात भूसंपादन, वन जमिनीचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. संबंधित यंत्रणांनी या रस्ता कामांमधील भूसंपादनाचे व वन जमिनीचे प्रश्‍न मार्गी लावावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली.
रस्ता कामामधील भूसंपादन व वन जमिनीच्या प्रश्‍नासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  बैठकीला व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, उपवनसंरक्षक श्री. गजभिये, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, प्र. अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, उपवनसरंक्षक (वन्यजीव) श्री. रेड्डी आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ शिंगणे सूचना देताना म्हणाले, चिखली ते देऊळगाव राजा महामार्गावरील टाकरखेड जवळील भूसंपादनाचे काम तातडीने मार्गी लावून पुलाजवळील दोन्ही रस्ता पूर्ण करावा. चिखली ते खामगाव रस्त्यावरील पेठ गावाजवळील पैनगंगा नदीवरील पुलाचे कामही भूसंपादनामुळे थांबलेले आहे. याठिकाणी सुद्धा भूसंपादन करून जागा द्यावी. जेणेकरून पुलाचे काम मार्गी लागेल, असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीला संबंधीत यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.