पालकमंत्र्यांना रुग्णालयातून सुटी;मुंबईच्या ब्रिज कॅण्डी रुग्णालयात घेत होते उपचार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबईच्या ब्रिज कॅण्डी रुग्णालयात ते उपचार घेत होते. आज, 22 फेब्रुवारीला त्यांची तब्येत ठणठणीत बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी बुलडाण्यातल्या एका कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील,राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री खडसे हे एकाच व्यासपीठावर एकत्रित आले होते. नंतरच्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबईच्या ब्रिज कॅण्डी रुग्णालयात ते उपचार घेत होते. आज, 22 फेब्रुवारीला त्यांची तब्येत ठणठणीत बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

काही दिवसांपूर्वी बुलडाण्यातल्या एका कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील,राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री खडसे हे एकाच व्यासपीठावर एकत्रित आले होते. नंतरच्या काळात या तिघांनाही कोरोनाने गाठले होते. बुलडाणा जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या संपूर्ण काळात पालकमंत्री शिंगणे हे रुग्णालयातून जिल्ह्यातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.