पालकांनो जरा ही बातमी वाचा… शाळेच्‍या ऑनलाइन क्‍लासदरम्‍यान अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज!; खामगाव शहरातील धक्‍कादायक घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः झूम ॲपवर शाळेच्या ऑनलाइन क्लास दरम्यान १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठविण्यात आल्याची धक्कादायक घटना खामगाव शहरात समोर आली आहे. ही घटना १७ जुलै रोजी खामगाव शहरातील दाळभैल भागातील मुलीसोबत घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १७ जुलैला अल्पवयीन मुलगी तिच्या शाळेच्या वर्गात झूम ॲपवर …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः झूम ॲपवर शाळेच्या ऑनलाइन क्लास दरम्यान १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठविण्यात आल्याची धक्‍कादायक घटना खामगाव शहरात समोर आली आहे. ही घटना १७ जुलै रोजी खामगाव शहरातील दाळभैल भागातील मुलीसोबत घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

१७ जुलैला अल्पवयीन मुलगी तिच्या शाळेच्या वर्गात झूम ॲपवर ऑनलाइन हजर होती. यावेळी तिच्यासोबत अन्य १७ मुलेही ऑनलाइन होती. क्लास सुरू असताना सिद्धांत प्रोफाइल असलेल्या एका मुलाने अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठवला व लैंगिक शेरेबाजी करून तिचा विनयभंग केला, अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झूम ॲपवर सिद्धांत प्रोफाईल असलेल्या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.