पावडर, फेअर अ‍ॅन्ड लव्हली, शाम्पू… देविदासला त्या रात्री अनेकांनी पाहिलं..!

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पॉन्ड्स पावडर, फेअर अॅन्ड लव्हली, शाम्पू, मेहंदी, विको क्रीम, बोरो प्लस क्रीम… असा पोतडीत भरून भरपूर माल त्याने चोरला. पण दुकानातून बाहेर पडताना त्याला अनेकांनी पाहिलं… दुकानमालक गेले काही दिवस जिवाला खात होता…चोरी कुणी केली असेल.. कोण माझ्या चांगल्यावर टपला असेल… अखेर दोन दिवसांपूर्वी बसस्थानकावर भेटलेल्या …
 

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पॉन्ड्स पावडर, फेअर अ‍ॅन्ड लव्हली, शाम्पू, मेहंदी, विको क्रीम, बोरो प्लस क्रीम… असा पोतडीत भरून भरपूर माल त्याने चोरला. पण दुकानातून बाहेर पडताना त्याला अनेकांनी पाहिलं… दुकानमालक गेले काही दिवस जिवाला खात होता…चोरी कुणी केली असेल.. कोण माझ्या चांगल्यावर टपला असेल… अखेर दोन दिवसांपूर्वी बसस्थानकावर भेटलेल्या ग्रामस्थांनी त्याला सांगितलं, गड्या तुझ्या दुकानातून देविदास मुंडे (रा. गाडेगाव खुर्द) त्या रात्रीला काहीतरी पोतडीत घेऊन भरून जात होता… लगेच दुकानमालकाने जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून देविदासविरुद्ध तक्रार दिली आहे. ही चोरीची घटना खांडवी (ता. जळगाव जामोद) येथे घडली आहे.

योगेश भागवत अवचार (35) असे दुकान मालकाचे नाव असून, त्याचे खांडवीत समर्थ जनरल स्टोअर आहे. 28 डिसेंबरला संध्याकाळी योगेश दुकान बंद करून घरी गेला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी येऊन पाहतो तर दुकानाचे कुलूप तुटलेले अन् बराच माल गायब. दोन सामानाच्या बॅगा किंमत 600 रुपये, पॉन्ड्स पावडर डब्बे 20 नग (किंमत 200), पॉन्ड्स क्रिम 24 नग पाऊच (किंमती 240), फेअर अ‍ॅण्ड लव्हली 10 नग पाऊच (किंमत 200), बाहुबली कंपनीच्या साड्या 6 नग (किंमती 1470 रुपये), साध्या साड्या 6 नग (किंमत 600), निशा मेहंदी 2 नग (किंमत 20 रुपये), विको क्रिम 12 नग (किंमत 120), बोरो प्लस 12 नग (किंमत 60), वाटिका शाम्पू 100 नग (किंमती 3800) असे साहित्य चोरीला गेले होते. चोरी कुणी केली असेल. पोलीस ठाण्यात तक्रार केली तरी आरोपी सापडेल का, अशा प्रश्‍नांनी गेले काही दिवस योगेशला भंडावून सोडले होते. अशातच 7 जानेवारीला बसस्थानकावर गप्पा मारताना चोरीचा विषय निघाला. त्याचबरोबर दीपक सोळंके, किसना पुंडे, अश्‍विन डोंगरदिवे, सोपान सारोकार, दिलीप डोंगरदिवे यांनी योगेशला सांगितले की समर्थ जनरल स्टोअर्समधून देविदास दामा मुंडे हा काहीतरी सामान पोतडीत भरून नेताना 29 डिसेंबरच्या पहाटे दोन- तीनच्या सुमारास पाहिला आहे. ही बाब ऐकताच योगेशने तातडीने पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. पोहेकाँ श्री. मापारी तपास करत आहेत.