पावभर जिलेबी पडली ७५ हजार रुपयांना; चिखली शहरातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रस्त्यावर स्कूटी उभी करून जिलेबी खाण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या स्कुटीची डिक्की फोडून भामट्याने ७५ हजार रुपये लंपास केले. चिखली शहरातील वर्दळीच्या डीपी रोडवर १६ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. काल, १७ सप्टेंबर रोजी शेतकऱ्याने चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली. आन्वी (ता. चिखली) येथील शेतकरी वासुदेव दौलतराव …
 
पावभर जिलेबी पडली ७५ हजार रुपयांना; चिखली शहरातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रस्त्यावर स्‍कूटी उभी करून जिलेबी खाण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या स्‍कुटीची डिक्की फोडून भामट्याने ७५ हजार रुपये लंपास केले. चिखली शहरातील वर्दळीच्या डीपी रोडवर १६ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. काल, १७ सप्टेंबर रोजी शेतकऱ्याने चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली.

आन्वी (ता. चिखली) येथील शेतकरी वासुदेव दौलतराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र बँकेचे कर्ज भरण्यासाठी ते चिखलीत आले होते. स्टेट बँकेतून ५० हजार व चिखली अर्बन बँकेतून काढलेले २५ हजार असे ७५ हजार रुपये त्यांनी स्कुटीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर चिखली येथील लक्ष्मी मार्केट येथे हरियाणा जलेबी सेंटरवर जिलेबी खाण्यासाठी ते गेले.

स्‍कुटी लक्ष्मी मार्केट येथील नागवाणी चार्टेड अकाउंटंट यांच्या कार्यालयासमोर उभी केली. थोड्या वेळात ते जिलेबी खाऊन परत आले व स्कुटी घेऊन कर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र बँकेत गेले. तिथे गेल्यावर त्यांनी डिक्की उघडून बघितली असता डिक्कीत त्यांना पैसे दिसले नाहीत. चोरट्याने डिक्कीचे लॉक तोडून ७५ हजार रुपये लंपास केल्याची तक्रार पवार यांनी दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.