पाहताच ती सुंदर बाला… व्‍हॉट्‌स ॲपवर Nude व्हिडिओ कॉल करून बसला!!; खामगाव तालुक्‍यातील खंडणीचा खळबळजनक प्रकार

बुलडाणा/खामगाव (कृष्णा सपकाळ/भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फेसबुकवर सुंदर दिसणाऱ्या मुलीची त्याला फ्रेंड रिक्वेस्ट आली. तो लगेच त्याने स्वीकारली. नंतर दोघांत चॅटिंग सुरू झाले. एकमेकांचे व्हॉट्स ॲप नंबर घेतले गेले. फेसबुकचा संवाद व्हॉट्स ॲपवर आला. नंतर तिने त्याला व्हिडिओ कॉल केला. तोही हुरळून गेला. तिने तिच्या अंगावरचे कपडे काढले, मग त्यानेही काढले… इथेच …
 

बुलडाणा/खामगाव (कृष्णा सपकाळ/भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः फेसबुकवर सुंदर दिसणाऱ्या मुलीची त्याला फ्रेंड रिक्वेस्ट आली. तो लगेच त्‍याने स्वीकारली. नंतर दोघांत चॅटिंग सुरू झाले. एकमेकांचे व्‍हॉट्‌स ॲप नंबर घेतले गेले. फेसबुकचा संवाद व्‍हॉट्‌स ॲपवर आला. नंतर तिने त्याला व्हिडिओ कॉल केला. तोही हुरळून गेला. तिने तिच्या अंगावरचे कपडे काढले, मग त्‍यानेही काढले… इथेच फसला! या व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग तिने केले होते. त्‍याआधारे त्‍याला ब्‍लॅकमेल सुरू केले. फेसबुक किंवा युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी दिली. तो घाबरून गेला. तिने पेटीएम नंबर देऊन पैसे टाकण्यास सांगितले. पण पातोंडा पेंडका येथील 25 वर्षीय तरुणाने आज, 18 जूनला धाडस दाखवले आणि खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्‍या ब्‍लॅकमेलर मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास केला जात आहे.

गेल्या काही दिवसांत अशी अनेक प्रकरणे जिल्ह्यात घडली आहेत. यात सामान्य व्यक्तीपासून उच्चशिक्षित लोकसुद्धा फसल्याची माहिती बुलडाणा लाइव्‍हच्‍या हाती लागली आहे. दुर्दैवाने बदनामीच्‍या भीतीने अनेक जणांनी पोलीस ठाण्याची पायरी चढलीच नाही. मात्र पातोंडा पेंडका (ता. खामगाव) येथील तरुणाने ते धाडस दाखवले, म्‍हणून तो एकप्रकारे आर्थिक नुकसानीपासून वाचला आहे. त्‍याला 8099725859 या क्रमांकावरून व्‍हॉट्‌स ॲपवर व्हिडिओ कॉल करण्यात आला होता. फेसबुकवर खाते हॅक केले असून, तुझ्या पत्‍नीचेही फोटो एडीट करून अश्लील फोटो तयार करून तुझ्या मित्रांच्‍या फेसबुक खात्‍यावर पाठवेल, अशी धमकीही तरुणीने त्‍याला दिली होती. सायबर क्राईमच्या भाषेत अशा प्रकरणांना (Sextortion) सेक्सटॉर्शन म्‍हणतात.

जिल्ह्यात हे प्रकार वाढलेत… म्‍हणून तुम्‍हीही सावध व्‍हा..!
फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरून अनोळखी सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट तुम्‍हालाही आली असेल तर वेळीच सावध व्‍हा. फसविण्याची पद्धतीही अगदी कुणीही जाळ्यात अडकेल अशी असते. सुरुवातीचे काही दिवस हाय, हॅलोच्‍या मेसेजवरून व्हाॅट्‌स ॲपवर चॅटिंग केले जाते. सुंदर मुलगी तिचे फोटो पाठवून त्‍याचा विश्वास संपादन करते. नंतर काही वेळा मोबाइलवर बोलणेही होते. नंतर व्हिडिओ कॉलवर बोलण्याची गळ घातली जाते. तिच्या गोड बोलण्याला बळी पडले की अडकलेच म्‍हणून समजा. पातोंडा पेंडकाच्‍या तरुणासोबतही असेच झाले. व्हिडिओ कॉलवर दोघेही एकमेकांसमोर नग्न होतात, अश्लील चाळे करतात. मात्र ती हे सर्व रेकॉर्ड करत असते. त्यानंतर काही वेळातच तो व्हिडिओ ती त्‍याच्या व्हाॅट्स अॅपवर पाठवते. हा व्हिडिओ फेसबुक किंवा इन्स्टाग्रामला अपलोड करते किंवा युट्यूबवर प्रसिद्ध करण्याची धमकी देते.

… मग पैशांची मागणी
इज्जतीला घाबरून जाळ्यात अडकलेला तरुण मुलीला गयावया करतो. तेव्हा ती हे टाळण्यासाठी पैशांची मागणी करते. बऱ्याच लोकांनी तरुणीच्या धमकीला घाबरून पैसे भरले. मात्र याबाबतीत तक्रार द्यायलाही लोक समोर येत नसल्याचे बुलडाणा जिल्हा सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सांगितले. असा प्रकार घडल्यानंतर इज्‍जतीला घाबरून लोक पैसे भरतात. नंतर त्यांच्यात झालेले संभाषण डिलीट करतात. फेसबुकवर संबंधित तरुणीला ब्लॉक करतात. कुणाच्या तरी सांगण्यावरून सायबर क्राईम विभाग गाठतात. पण तोपर्यंत सर्व पुरावे पीडित व्यक्तीने स्‍वतःच मिटवले असतात. त्‍यामुळे पोलिसांनाही तपास करायला मर्यादा येतात.

संकोच न करता लोकांनी तक्रार करावी
नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून लोकांना फसविल्याचे प्रकार जिल्ह्यातही घडले आहेत. मात्र तोंडी माहितीव्यतिरिक्त याबाबतीत तक्रार देण्यासाठी कुणी समोर येत नाही. तक्रारीशिवाय पुढील कारवाई करणार कशी? जे या प्रकाराला बळी पडले आहेत त्यांनी संकोच न तक्रार द्यावी.

– विलासकुमार सानप, सहायक पोलीस निरिक्षक, सायबर क्राईम ब्रँच, बुलडाणा