पिंपळखुट्यात दोन गटांत तुंबळ हाणामारी, कारण आहे क्षुल्लक!; 8 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरासमोर मोटारसायकल उभी करण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरून 8 जणांविरोधात मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 24 मे रोजी सायंकाळी 8 च्या सुमारास पिंपळखुटा (ता. मलकापुर) येथे घडली. सौ. नलिनी हिलालसिंग मोरे (रा. पिंपळखुटा) यांनी तक्रार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरासमोर मोटारसायकल उभी करण्याच्‍या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये  वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरून 8 जणांविरोधात  मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 24 मे रोजी सायंकाळी  8 च्या सुमारास पिंपळखुटा (ता. मलकापुर) येथे घडली.

सौ. नलिनी हिलालसिंग मोरे (रा. पिंपळखुटा) यांनी तक्रार दिली, की त्यांच्या शेजारीच राहणारे रवींद्र इंद्रसिंग मोरे याने आमच्या घरासमोर गाडी उभी केली. गाडी बाजूला लाव असे त्याला सांगितले असता त्याने माझ्या पतीला मारहाण केली. त्‍यांना सोडवण्यास गेली असता दीपक इंद्रसिंग मोरे, इंद्रसिंग रामभाऊ मोरे, कैलास रामभाऊ मोरे, सचिन शिवदास मोरे (सर्व रा. पिंपळखुटा) यांनीही नलिनी आणि त्यांच्या पतीला मारहाण केली व जीवे मारण्याचे धमकी दिली. तक्रारीवरून पोलिसांनी रवींद्रसह त्‍यांच्‍या कुटुंबातील 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

दुसऱ्या गटातील दीपक इंद्रसिंग मोरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की माझे वडील इंद्रसिंग मोरे यांनी शेजारील हिलालसिंग मोरे यांच्या घरासमोर मोटारसायकल लावली असता हिलालसिंग मोरे, त्यांची पत्‍नी व मुलाने वडिलांना शिविगाळ केली. तेवढ्यात माझा भाऊ रवींद्र ,आई सिंधूबाई व चुलत भाऊ पंकज भांडणाचा आवाज ऐकून बाहेर आले असता गजानन मोरेने रवींद्र मोरे याच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण केली. सोडवण्यासाठी गेलेल्या आईलाही मारले. चुलत भाऊ पंकजला देखील मारहाण केली. भांडण आवरण्यास गेलो असता मलाही चावा घेतला. दुसऱ्या दिवशी उपचारासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. या  तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी हिलालसिंग जुलालसिंग मोरे, नलिनी हिलालसिंग मोरे व गजानन हिलालसिंग मोरे (रा. पिंपळखुटा ता. मलकापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.