पिंपळगाव राजा जलशुद्धीकरण केंद्रातच जुगार अड्डा!; ८ कर्मचारी पकडले, साडेपाच लाख रुपयांची कारवाई

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिंपळगाव राजा (ता. खामगाव) जलशुद्धीकरण केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनी तिथेच जुगाराचा डाव मांडला. पोलिसांना या प्रकाराची कुणकुण लागल्याने छापा मारून ७ कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खामगावच्या शिवाजीनगर पोलिसांनी काल, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई केली. पिंपळगाव राजा रोडवर …
 
पिंपळगाव राजा जलशुद्धीकरण केंद्रातच जुगार अड्डा!; ८ कर्मचारी पकडले, साडेपाच लाख रुपयांची कारवाई

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिंपळगाव राजा (ता. खामगाव) जलशुद्धीकरण केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांनी तिथेच जुगाराचा डाव मांडला. पोलिसांना या प्रकाराची कुणकुण लागल्याने छापा मारून ७ कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या ताब्‍यातून साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खामगावच्‍या शिवाजीनगर पोलिसांनी काल, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्‍या सुमारास ही कारवाई केली.

पिंपळगाव राजा जलशुद्धीकरण केंद्रातच जुगार अड्डा!; ८ कर्मचारी पकडले, साडेपाच लाख रुपयांची कारवाई

पिंपळगाव राजा रोडवर खामगाव शहराला पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रात जुगाऱ्यांचा मेळा भरल्याची माहिती गोपनीय बातमीदारांकडून शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा मारला. त्यावेळी रमेश ज्ञानदेव वानखेडे (४०, रा. किसननगर खामगाव), मुरलीधर रामभाऊ बर्डे (६०, रा. भाटिया ले आउट, खामगाव), नरेंद्र शंकरराव खडसे (५८, रा. भाग्योदय कॉलनी, खामगाव), रामदास किसन लोखंडे (५९, रा. गुरुदत्तनगर, खामगाव), अशोक रंगनाथ इंगळे (५६, रा. पांचाळ शिक्षक कॉलनी, चिखली रोड खामगाव), कैलास विश्वनाथ पारखेडकर (६०, रा. सुटाळा बुद्रूक, खामगाव ), शेषराव पुंडलिक शेगोकार (५९, रा. बर्डे प्लॉट खामगाव) हे ७ जण जुगार खेळत होते.

या सर्वांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून नगदी ७ हजार ७३० रुपये, ३ मोबाईल (किंमत १८ हजार रुपये), ४ मोटारसायकली (किंमत १ लाख २० हजार रुपये) व एक कार (किंमत ४ लाख रुपये) असा एकूण ५ लाख ४५हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, खामगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी, सहायक पोलीस निरिक्षक रवींद्र लांडे, पोहेकाँ निलसिंग चव्हाण, पो.ना. संदीप टाकसाळ, पो.ना. सागर भगत, पो.ना. अरविंद बडगे, पो.ना. प्रदीप मोठे, पोकाँ रवींद्र कन्नर यांनी केली.