पिकविम्यासाठी चिखलीत भाजप किसान मोर्चाचे धरणे आंदोलन

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पिक विम्याची रक्कम तत्काळ मिळावी या प्रमुख मागणीसाठी आज, 22 जूनला भाजपा किसान मोर्चातर्फे तहसीलदार कार्यालयासमोर आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी कृषी सचिव एकनाथ डवले साहेब यांची 21 जून रोजी भेट घेऊन पीकविमा, …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पिक विम्याची रक्कम तत्‍काळ मिळावी या प्रमुख मागणीसाठी आज, 22 जूनला भाजपा किसान मोर्चातर्फे तहसीलदार कार्यालयासमोर आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी कृषी सचिव एकनाथ डवले साहेब यांची 21 जून रोजी भेट घेऊन पीकविमा, कर्ज माफी व पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

आंदोलनात राजेश अंभोरे, चक्रधर लांडे, डॉ. प्रतापसिंह राजपूत, रामदास देव्हडे, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, किशोर जामदार, विजय परिहार, अ. शकूर अ. अजीद, गजानन रसाळ, पंकज देशमुख, विजय परिहार, राजेश अंभोरे, गजानन बनकर, संतोष ठाकरे, रमेश सोळंकी, उद्धवराव पवार, नितीन सावळे, दिगंबर जाधव, राजेंद्र जाधव, बळीराम खरपास, राजेंद्र सदावर्ते, संतोष जाधव, श्रीराम जाधव, उद्धवराव जवंजाळ, प्रज्‍ज्वल जाधव, स्वप्नील काकडे, बद्रीनाथ जाधव, रवींद्र जुमडे, गुलाबराव सोळंकी, संजय झिने, ज्ञानेश्वर जाधव, मसूद खाँ उस्मान खाँ, तुलसीदास उमाळे, महादेव ठाकरे, गजानन काळे, गजानन दुधाळे, रामभाऊ राठोड, ज्ञानू खापकी, ओम अंभोरे, अमोल भुसारी, ज्ञानेश्वर सोळंकी, दिलीपभाऊ डागा, भास्कर गिऱ्हे, रमेश आकळ, संजय गुंजाळकर, विलास ठेंग, सुनील झिने, योगेश जंगले, अनथा वाघमारे, दत्तात्रय वाघमारे, संतोष झाल्टे, सुरेश जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.