पिसाळलेल्या कुत्र्याचा तिघांना चावा; जिल्हा रुग्णालयात रेबिज लसीचा नाही पत्ता!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिसाळलेल्या कुत्र्याने तिघांना चावा घेतला. ही घटना आज, ८ जुलैला चांडोळजवळील शिंदी (ता. जाफराबाद जि. जालना) येथे सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. जखमींना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले; परंतु रेबिज लस उपलब्ध नसल्याने त्यांना अकोला जाण्यास सांगण्यात आले. प्रमोद हरिभाऊ जंजाळ (५०), शुभम राजू गहलोत (६), सोहम नारायण निकाळजे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पिसाळलेल्या कुत्र्याने तिघांना चावा घेतला. ही घटना आज, ८ जुलैला चांडोळजवळील शिंदी (ता. जाफराबाद जि. जालना) येथे सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. जखमींना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले; परंतु रेबिज लस उपलब्ध नसल्याने त्यांना अकोला जाण्यास सांगण्यात आले. प्रमोद हरिभाऊ जंजाळ (५०), शुभम राजू गहलोत (६), सोहम नारायण निकाळजे (४) अशी जखमींची नावे आहेत. संध्याकाळी गावात कुत्र्याने धुमाकूळ घातला. एकाच गावातील तिघांवर हल्ला चढवल्याने संतप्त गावकऱ्यांनी कुत्र्याला मारून टाकले.