पीएम मोदींकडून १३ मजुरांच्‍या कुटुंबियांना २ लाखांची मदत, जखमींना ५० हजार!; राज्‍य सरकारची असंवेदनशिलता चव्‍हाट्यावर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे अर्थात समृद्धी महामार्गाच्या कामावरील १३ मजूर काल, २० ऑगस्टला टिप्पर अपघातात ठार झाले. या मजुरांच्या मृत्यूबद्दल शोकसंवेदनाही व्यक्त करण्याची गरज वाटली नाही तिथे राज्य सरकारकडून काही मदत मिळेल याची शाश्वती तशी कमीच होती. केंद्र सरकारने मात्र तातडीने या गंभीर घटनेची दखल घेत मृतकांच्या कुटुंबियांना २ लाख …
 
पीएम मोदींकडून १३ मजुरांच्‍या कुटुंबियांना २ लाखांची मदत, जखमींना ५० हजार!; राज्‍य सरकारची असंवेदनशिलता चव्‍हाट्यावर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे अर्थात समृद्धी महामार्गाच्‍या कामावरील १३ मजूर काल, २० ऑगस्‍टला टिप्पर अपघातात ठार झाले. या मजुरांच्‍या मृत्‍यूबद्दल शोकसंवेदनाही व्‍यक्‍त करण्याची गरज वाटली नाही तिथे राज्‍य सरकारकडून काही मदत मिळेल याची शाश्वती तशी कमीच होती. केंद्र सरकारने मात्र तातडीने या गंभीर घटनेची दखल घेत मृतकांच्‍या कुटुंबियांना २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तशी माहिती दस्‍तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या व्‍टिटर हँडलद्वारे केली आहे. तढेगाव फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला होता. मृतक मजूर मध्यप्रदेशातील असल्याने राज्य सरकारला या अपघाताचे सोयरसुतक वाटले नसावे, असेच एकूण चित्र काल आणि आजही पहायला मिळाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनेची दखल घेत मृतक व जखमींच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अपघात व्यथित करणारा आहे. आम्ही मृतकांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. जखमी लवकर बरे होवोत, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.