पीरबाबा संस्‍थानचा “मन्नत’ म्‍हणून सोडलेला बोकड ट्रकचालक नेत होता चोरून…ग्रामस्‍थांनी पाठलाग करून पकडले!; जांब येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जांब (ता. बुलडाणा) येथे पीरबाबा संस्थान आहे. या संस्थानसाठी गावातील अजमत शाह यांनी पांढरा बोकडा दोन वर्षांपूर्वी मन्नत म्हणून सोडला आहे. हा बोकड चोरून नेण्याचा प्रयत्न एका ट्रकचालकाने केल्याचा प्रकार काल, 24 जूनच्या रात्री पावणेबाराच्या सुमारास घडला. ग्रामस्थांनी या ट्रकला पाठलाग करून पकडले. मात्र चालक पसार होण्यात यशस्वी झाला आहे. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जांब (ता. बुलडाणा) येथे पीरबाबा संस्‍थान आहे. या संस्‍थानसाठी गावातील अजमत शाह यांनी पांढरा बोकडा दोन वर्षांपूर्वी मन्‍नत म्‍हणून सोडला आहे. हा बोकड चोरून नेण्याचा प्रयत्‍न एका ट्रकचालकाने केल्याचा प्रकार काल, 24 जूनच्‍या रात्री पावणेबाराच्‍या सुमारास घडला. ग्रामस्‍थांनी या ट्रकला पाठलाग करून पकडले. मात्र चालक पसार होण्यात यशस्वी झाला आहे.

साबीर सरदार पठाण (28) याचे जांबमध्ये बुलडाणा- औरंगाबाद रस्‍त्‍यावर गॅरेज आहे. गॅरेजच्‍या बाजूलाच तो राहतो. बोकड त्‍याच्‍या दुकानासमोरच बांधलेला असतो. 24 जूनला रात्री पावणेबाराच्‍या सुमारास हा बोकड औरंगाबादकडून आलेल्या ट्रक (क्र. MP 09 GF9151) चालकाने पळवून नेण्याचा प्रयत्‍न केला. बोकड घेऊन तो धाडच्या दिशेने गेला. ही बाब साबीर पठाणच्‍या लक्षात आल्याने त्‍याने राजू सुसर व अमजत शाह यांना घेऊन ट्रकचा पाठलाग सुरू केला.

धाड येथे बुलडाणा अर्बन बँकेसमोर ट्रक काही लोकांच्‍या मदतीने थांबविण्यात आला. ट्रकचालकाचे नाव विचारले असता त्‍याने सै. समीर सै. सगीर (24, रा. बैलबाजार, शहापूर जि. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) असे सांगितले. ट्रकमध्ये बोकूड मिळून आले. विचारपूस सुरू असतानाच सै. समीरने लघवीला जातो असे सांगून तिथून पळून गेला. पोलिसांनी साबीरच्‍या तक्रारीवरून सै. समीरविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. पेंढारकर करत आहेत.