पुढील तीन दिवस जिल्हाभर सर्वत्र पाऊस! २२ ऑगस्टपासून “मुसळधार’ची शक्‍यता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या १५ दिवसांपासून रखडलेला पाऊस जिल्ह्यात परतण्याची चिन्हे आहेत. आज, १७ ऑगस्टच्या सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वदूर ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत. आजपासून १९ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामाने विभागाने वर्तविली आहे. याच काळात मेहकर तालुका व लगतच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. …
 
पुढील तीन दिवस जिल्हाभर सर्वत्र पाऊस! २२ ऑगस्टपासून “मुसळधार’ची शक्‍यता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या १५ दिवसांपासून रखडलेला पाऊस जिल्ह्यात परतण्याची चिन्हे आहेत. आज, १७ ऑगस्‍टच्‍या सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वदूर ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत. आजपासून १९ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्‍यता हवामाने विभागाने वर्तविली आहे. याच काळात मेहकर तालुका व लगतच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. २० व २१ ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी हलका पाऊस तर २२ ते २६ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या १५ दिवसांपासून जिल्हाभर पावसाचा खंड पडला होता. अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन, उडीद, तूर, मूग ही पिके करपली होती. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनाही रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत होते. हवामान विभागाने आज वर्तविलेला अंदाज खरा ठरला तर पिकांना संजीवनी मिळणार आहे.

शेतकऱ्यांनो ही घ्या काळजी…
येत्या तीन दिवसांत सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी ओलीत करणे, खत देणे, फवारणी ही कामे पुढे ढकलावीत. पावसाचे पाणी शेतात साचणार नाही याची काळजी घ्यावी. साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा करावा. जनावरांचा गोठा कोरडा ठेवावा व फळबागांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राचे मनीष येदुलवार यांनी केले आहे.