पुण्यातील गोळीबारासाठी शेगावमधून पुरवले पिस्तूल!; पुण्याचे पोलीस शेगावमध्ये धडकले

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एकतर्फी प्रेमातून कारमधून जाणाऱ्यावर गोळीबार करण्याचा प्रकार काल, 27 मे रोजी पुण्यातील खडकवासलाजवळील कोल्हेवाडीत घडला होता. याप्रकरणी हवेली पोलिसांनी अक्षय ऊर्फ रावण चंद्रकांत उभे (रा. कोल्हेवाडी) याला कालच अटक होती. पोलीस तपासात या घटनेचे शेगाव कनेक्शन समोर आले आहे. आरोपीला पिस्तूल त्याच्या शेगावच्या एका मित्राने पुरवली असल्याची कबुली दिल्यावरून आज, …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एकतर्फी प्रेमातून  कारमधून जाणाऱ्यावर गोळीबार करण्याचा प्रकार काल, 27 मे रोजी पुण्यातील खडकवासलाजवळील कोल्हेवाडीत घडला होता. याप्रकरणी हवेली पोलिसांनी अक्षय ऊर्फ रावण चंद्रकांत उभे  (रा. कोल्हेवाडी) याला कालच अटक होती. पोलीस तपासात या घटनेचे शेगाव कनेक्शन समोर आले आहे. आरोपीला पिस्तूल त्याच्या शेगावच्या एका मित्राने पुरवली असल्याची कबुली दिल्यावरून आज, 28 मे रोजी पुणे पोलिसांनी शेगावात येऊन आरोपीच्या मित्राला अटक केली. रवींद्र रमेश खेडकर (36) असे शेगावातून अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत वापरलेली देशी पिस्तूल  रवींद्रकडून  45 हजार रुपयांत घेतल्याची कबुली अक्षयने दिली होती.