पुण्यातून चोरलेले सोने मलकापुरात विकले! मलकापुरातील सराफा व्‍यावसायिक ताब्‍यात!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चोरीचे सोने विकत घेणे मलकापुरातील सराफा व्यावसायिकाला भोवले आहे. त्याला 4 मार्चला सायंकाळी 7 च्या सुमारास पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. पुण्यातील तळेगाव पिंपरी चिंचवड भागात घरफोडी होऊन सोने चोरीला गेले होते. 15 नोव्हें 2020 रोजी तळेगाव एमआयडीसी परिसरात लिंग्या ऊर्फ अजीत व्यंकटेश पवार (30 रा. जेऊर अक्कलकोट ता.सोलापूर) याने घर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चोरीचे सोने विकत घेणे मलकापुरातील सराफा व्‍यावसायिकाला भोवले आहे. त्‍याला 4 मार्चला सायंकाळी 7 च्‍या सुमारास पुणे पोलिसांनी ताब्‍यात घेतले. पुण्यातील तळेगाव पिंपरी चिंचवड भागात घरफोडी होऊन सोने चोरीला गेले होते.

15 नोव्हें 2020 रोजी तळेगाव एमआयडीसी परिसरात लिंग्या ऊर्फ अजीत व्‍यंकटेश पवार (30 रा. जेऊर अक्कलकोट ता.सोलापूर) याने घर फोडून सात तोळे आठ ग्रॅम सोने (किंमत अंदाजे एक लाख 56 हजार रुपये) चोरले होते. मलकापूर येथील गोविंद विष्णू महाजन विद्यालयासमोरील प्रांगणात लिंग्याची मावशी राहते. मावशीच्या मदतीने त्याने ते सोने मलकापूर येथील सराफा व्यवसायिकास विकले होते. त्याच्या सांगण्यावरून पुणे पोलिसांनी मलकापूर गाठत या संशयित सराफा व्यावसायिकास ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. पुणे येथील पोलिस निरीक्षक रामदास इंगोले, पो. काँ. दत्तात्रय बनसोडे पो. ना. धनंजय भोसले, पो.काँ. ज्ञानेश्वर गाडेकर यांचे पथक मलकापूरला आले होते. मलकापूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी पो.काँ.सलीम बर्डे, पो.काँ. संजय पठार आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी पुणे येथील पथकाला सहकार्य केले.