पुण्यात शिजली तब्बल ७ टनांची महामिसळ

पुणे : पुणे तेथे काय उणे असे म्हटले जाते. सतत नवनवीन कल्पना राबविणारे हे शहर अस्सल खवय्येगिरीसाठीही प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकाराने सूर्यादत्त ग्रुप ऑफ इन्स्ट्यिूट मदतीने रविवारी तब्बल ७ टनांची महामिसळ शिजविण्यात आली. ही मिसळ तयार करण्यासाठी तब्बल सात तास लागले. त्यात दीड हजार किलो मटकी, ५०० किलो कांदा, १२५ किलो …
 

पुणे : पुणे तेथे काय उणे असे म्हटले जाते. सतत नवनवीन कल्पना राबविणारे हे शहर अस्सल खवय्येगिरीसाठीही प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकाराने सूर्यादत्त ग्रुप ऑफ इन्स्ट्यिूट मदतीने रविवारी तब्बल ७ टनांची महामिसळ शिजविण्यात आली. ही मिसळ तयार करण्यासाठी तब्बल सात तास लागले. त्यात दीड हजार किलो मटकी, ५०० किलो कांदा, १२५ किलो अद्रक, १२५ किलो लसून, ४०० किलो तेल, १८० किलो कांदा-लसून मसाला, ५० किलो लाल तिखट, ५० किलो हळद, २५ किलो मीठ, ११५ किलो खोबरे, १२०० किलो फरसाण, ४५०० लिटर पाणी, ५० किलो कोथिंबीर, १५ किलो तेजपत्ता असे साहित्य वापरण्यात आले. ही मिसळ शिजविण्यासाठी ३३ बाय २२ची वेगळी चूल तयार करण्यात आली होती. तर तशीच मोठी कढई घेण्यात आली होती. ही मिसळ नंतर गरजूंना अन्नदान म्हणून वाटण्यात आली. या महामिसळची विश्वविक्रमासाठी नोंद व्हावी म्हणून गिनीज बुकककडे त्याचा तपशील पाठवण्यात येणार आहे.