पुन्हा इंधन दरवाढीचा झटका; पेट्रोल 93 रुपये लिटरच्या उंबरठ्यावर

मुंबई (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज, 27 जानेवारीलाही सरासरी 25 पैशांची वाढ पेट्रोलियम कंपन्यांनी केली आहे. डिझेलही उच्चांकी दराच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्यात पेट्रोल 93 रुपये लिटरच्या उंबरठ्यावर पोहोचले असून, आज 92.86 रुपये असा दर आहे, तर डिझेलचा दर 83.30 रुपयांवर गेला आहे.पेट्रोलियम कंपन्यांनी …
 

मुंबई (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज, 27 जानेवारीलाही सरासरी 25 पैशांची वाढ पेट्रोलियम कंपन्यांनी केली आहे. डिझेलही उच्चांकी दराच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्यात पेट्रोल 93 रुपये लिटरच्या उंबरठ्यावर पोहोचले असून, आज 92.86 रुपये असा दर आहे, तर डिझेलचा दर 83.30 रुपयांवर गेला आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सुरू ठेवलेली दरवाढ सामान्यांचा खिसा रिकामा करत आहेत. मात्र केंद्र सरकार कोणतीची हालचाल करत असल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत. जागतिक बाजारातील महागाईचे कारण देत ही दरवाढ सुरू आहे. याच महिन्यात नऊवेळा दरवाढ झाली आहे. 2 रुपये 25 पैशांची चालू महिन्यात इंधन दरवाढ झाली. जागतिक बाजारात क्रूड ऑईलचा भाव 52.50 डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल 55.57 डॉलर आहे. इंधन दरवाढीविरोधात देशभरात रोष पाहायला मिळत आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने मात्र गेल्या सहा वर्षांत पेट्रोल-डिझेलच्या एक्साइज शुल्कातून 20 लाख कोटी रुपये कमावल्याचा आरोप काँग्रेसने रविवारी केला होता.