Update : पुन्हा उसळी! 1140 पॉझिटिव्ह; 5 बळी!! संग्रामपूरसह सर्वच तालुक्यांत कोरोनाचा स्फोट

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तीन आकड्यांत वावरणाऱ्या कोरोनाने आज, 12 मे रोजी अचानक उसळी घेत अकराशेचा आकडा पार केला. संग्रामपूरसह सर्वच तालुक्यांत कोरोनाचा स्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पाच जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. मागील चारेक दिवसांपासून अहवाल तपासणीचा वेग मंदावला …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तीन आकड्यांत वावरणाऱ्या कोरोनाने आज, 12 मे रोजी अचानक उसळी घेत अकराशेचा आकडा पार केला. संग्रामपूरसह सर्वच तालुक्यांत कोरोनाचा स्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पाच जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.

मागील चारेक दिवसांपासून अहवाल तपासणीचा वेग मंदावला होता. त्यामुळे रुग्ण संख्याही कमी झाल्याचे चित्र होते. मात्र हा वेग वाढल्यावर गत्‌ 24 तासांत पॉझिटिव्हचा आकडा 1143 वर जाऊन ठेपला. नांदुरा 137, बुलडाणा 117, खामगाव 114, लोणार 110 या तालुक्यांतील रुग्णसंख्या शतकापार गेली! याशिवाय सिंदखेड राजा 91, जळगाव जामोद 81, मोताळा 62, मलकापूर 47, मेहकर 98, चिखली 79, देऊळगाव राजा 82 या तालुक्यांतील उद्रेक भयावह ठरावा असाच आहे. संग्रामपूर तालुक्यात 51 पॉझिटिव्ह निघाले म्हणजे कोरोनाचा स्फोट किती भयावह आहे हे स्पष्ट होते.

दरम्यान, पेशंटच्या मृत्यूची मालिका कायम असल्याचे चित्र आहे. आज पाच जणांचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान सुटाळा बुद्रूक खामगाव येथील 65 वर्षीय महिला, बोथाकाजी (ता. खामगाव) येथील 56 वर्षीय महिला, भालखेड (ता. मेहकर) येथील 64 वर्षीय पुरुष, जळगाव जामोद येथील 80 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे आजवरच्या बळींचा आकडा 491 वर पोहोचलाय! मे मध्यावर हा आकडा 500 चा भीषण आकडा गाठेल असेच चित्र आहे.

4539 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5682 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4539 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1143 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 920 व रॅपिड टेस्टमधील 223 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 2304 तर रॅपिड टेस्टमधील 2235 अहवालांचा समावेश आहे.

4762 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू

आज 456 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 394659 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 68626 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 2996 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 4762 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 490 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.