पुन्‍हा दुकाने ७ ते ४!; लेव्‍हल ३ मधील निर्बंध जिल्ह्याला लागू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोविड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत. सर्व जिल्ह्यांचा समावेश लेव्हल ३ मध्येच केला आहे. बुलडाणा जिल्हाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे ४ जूनला जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश लागू केले होते, तेच …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोविड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत. सर्व जिल्ह्यांचा समावेश लेव्‍हल ३ मध्येच केला आहे. बुलडाणा जिल्हाही त्‍याला अपवाद नाही. त्‍यामुळे ४ जूनला जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश लागू केले होते, तेच पुन्हा जिल्ह्यासाठी लागू झाले आहेत. त्‍यामुळे पुन्‍हा एकदा दुकाने सकाळी 7 ते 4 पर्यंतच सुरू ठेवावी लागणार आहे. लेव्‍हल ३ च्‍या बंधनांसह त्याहून उच्च दर्जाची बंधने किंवा अधिक बंधने लागू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्‍यांना यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याच्या परवानगीची गरज नसेल.

हे होते लेव्‍हल ३ चे आदेश….

  • लेव्‍हल ३ मधील आदेशानुसार, सर्व किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, मिठाई दुकाने, खाद्य पेय विक्री दुकाने, पिठाची गिरणी, तसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थांची दुकाने (चिकन, मटन, पॉल्ट्री, मासे आणि अंडी दुकाने), पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने, तसेच दूध व दूग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी) आदी दुकाने, कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने, कृषि प्रक्रिया, उद्योग गृहे, शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी निगडीत दुकाने, ५० टक्के आसन क्षमतेसह शिव भोजन केंद्र दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवा अंतर्गत येत असलेली दुकाने, प्रतिष्ठाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. ही दुकाने शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील. मॉल्स, चित्रपटगृहे पूर्णतः बंद राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट व खानावळ 50 टक्के आसन क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार तसेच अन्य दिवशी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत केवळ घरपोच सेवेला परवानगी राहील.
  • सार्वजनिक ठिकाणे, खुले मैदान, फिरणे व सायकलिंग साठी सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत परवानगी असेल. सर्व प्रकारची खासगी कार्यालये दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये एकूण उपस्थिती क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील. रोज सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत खेळांना परवानगी असेल. सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम स्थानिक प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीने व 50 टक्के क्षमतेसह घेण्यास परवानगी असेल. असे कार्यक्रम शनिवार व रविवार बंद असतील.
  • सर्व केशकर्तनालये,सलुन, स्पा, ब्युटी पार्लर एकूण क्षमतेच्या 50 टक्के पूर्व नोंदणीसह सुरू राहतील. वातानुकूलित सेवेस परवानगी नाही. लग्न समारंभ बँड पथक, कॅटरिंग आदींसह पूर्व परवानगीने 50 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. अंत्यसंस्काराला 20 व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी असेल. सभा, बैठका आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीमध्ये घेता येतील. बांधकामावर जर बाहेरून मजूर असतील तर दुपारी 4 वाजेपर्यंत करता येतील. ई कॉमर्स व वस्तू सेवा नियमितपणे सुरू राहतील. सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेसह सुरू राहील. मात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील. जास्तीत जास्त तीन व्यक्तींच्या परवानगीसह मालवाहतूक नियमितपणे सुरू राहील.
  • सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशु चिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरू राहतील. सर्व प्रकारचे सहकारी संस्था, खासगी व शासकीय बँका, विमा व वैद्यकीय सेवा कंपन्या, नॉन बँकिंग वित्तीय संस्था सुरू राहतील. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील. तसेच सायंकाळी 5 नंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. या कालावधीत नागरिकांना मुक्त संचार करण्यास मनाई राहील.

राज्‍य सरकारने आज काढलेले आदेश…

  • राज्यस्तरीय ट्रिगर्स ः कोविड-19 आजार पसरवणारा विषाणूमध्ये विविध भौगोलिक प्रदेशांत म्युटेशन होत असून हा नव्या रूपातील विषाणू अधिक संक्रमणशीलता आणि रुग्णाच्या शरीरात मोनोक्लोनल अँटीबॉडी रिस्पॉन्सच्या बाबतीत घट दर्शवित आहे. हे लक्षात घेता सर्व प्रशासकीय क्षेत्रांमध्ये, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी निर्देशांक आणि ऑक्सिजन सुविधायुक्त खाटांची टक्केवारी कितीही असली तरी त्यांनी बंधनांचा स्तर, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांकडून स्पष्ट आदेशान्वये जोवर बंधने मागे घेतली जात नाहीत तोवर तिसऱ्या स्तराइतका ठेवावा, असे बंधन राज्य स्तरावरील ट्रिगरकडून घालण्यात आले आहे.
  • साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर ः बंधनांचे स्तर लागू करण्याचा निर्णय घेण्यासाठी लक्षात घ्यायचा साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर केवळ आरटी-पीसीआर चाचण्यांच्या आधारावरच निश्चित करण्यात यावा आणि तो आरएटी किंवा इतर चाचण्यांच्या आधारे निश्चित करण्यात येऊ नये. यासाठीची आकडेवारी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येईल.
  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांनी बंधनांचे स्तर घोषित करण्यासाठी वापरायची पद्धतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी घ्यावी आणि त्यांच्या अखत्यारीतील विविध प्रशासकीय क्षेत्रांमध्ये बंधनाचे कोणते स्तर लागू करता येऊ शकतील याबाबत कार्यान्वित असलेल्या कोणत्याही राज्य स्तरावरील ट्रिगरच्या संदर्भाने निर्णय घ्यावा. 4 जून 2021 रोजीच्या आदेशात किमान स्तर दिला आहे, राज्य स्तरावरील ट्रिगरच्या संदर्भाने तो तळाचा स्तर मानण्यात यावा. मात्र, 4 जून 2021 रोजीच्या आदेशाच्या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्याच तळाच्या स्तरावरील बंधनांसह त्याहून उच्च दर्जाची बंधने किंवा अधिक बंधने लागू करण्याबाबत निर्णय घेऊ शकतील. अशाप्रकारे उच्च दर्जाची बंधने किंवा अधिक बंधने लागू करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याला राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याच्या परवानगीची गरज नसेल.
  • बंधनांबाबत खालचा स्तर लागू करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याने, खालच्या स्तराची बंधने लागू करण्यापूर्वी मागील दोन आठवड्यांतील परिस्थिती लक्षात घ्यायला हवी. जेव्हा पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत असेल आणि सध्या लागू असलेल्या बंधनांच्या स्तरापेक्षा वरच्या स्तराची बंधने लागू करण्याची गरज भासत असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याने दोन आठवड्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्याची वाट न पाहाता तातडीने तशा प्रकारचा निर्णय घ्यावा.

जिल्हा प्रशासनाला मिळालेले आदेश…

  • लोकजागृतीच्या उपक्रमांद्वारे लसीकरणाचा वेग वाढवणे, पात्र लोकांपैकी किमान 70 टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे.
  • कोविडचा प्रसार रोखण्यासाठी टेस्ट-ट्रॅक-ट्रीट या पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करावा.
  • कोविडच्या विषाणूचा हवेतून प्रसाराचा गुणधर्म लक्षात घेता हेपा फिल्टर्स किंवा एक्झॉस्ट फॅनचा वापर करून वातानुकूलनाच्या उचित नियमांचे पालन करीत कामकाजाच्या ठिकाणांची व कार्यालयांची सुरक्षितता निश्चित करणे संबंधितांना बंधनकारक करावे.
  • सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अपेक्षित चाचण्या आणि आरटी-पीसीआर चाचण्या तसेच इतर चाचण्या मोठ्या प्रमाणावर कराव्यात.
  • कोविडरोधक वर्तणूक न करणाऱ्यांवर प्रभावीपणे दंडात्मक कारवाई करावी.
  • गर्दी, जमाव आणि मेळाव्यांना प्रोत्साहन मिळेल असे सोहळे/कार्यक्रम/उपक्रम टाळावेत.
  • न्याय्य पद्धतीने कन्टेनमेन्ट क्षेत्रे घोषित करावीत जेणेकरून छोट्या क्षेत्रावर, विशेष करून बाधित क्षेत्रावरच बंधने लागू होतील.
  • विशेष करून विवाह सोहळे आणि उपाहारगृह, मॉल यासारख्या गर्दीची अधिक शक्यता असलेल्या ठिकाणांची तपासणी करून CAB च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फिरती पथके नियुक्त करावीत. CAB चे नियम हे बंधने कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहेत. हे सामाजिक पातळीवर पाळायचे नियम आहेत. सदर नियमांचे पालन न केल्यास नागरीकांना दंड होईल. सदर आदेश मा.राज्यपालांच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत असे परिपत्रक महसूल,वने,आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन विभागाकडून २५ जून रोजी प्रसिध्दीस देण्यात आले आहे.