पुन्‍हा बार फोडले..! किनगाव राजात 68 हजारांच्‍या विदेशी दारूवर चोरट्यांचा डल्ला

किनगाव राजा (नीलेश डिघोळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः किनगाव राजा बसस्थानकाजवळील विनोद वाईन बार फोडून चोरट्यांनी 68 हजार 179 रुपयांची विदेशी दारू लंपास केली आहे. ही घटना आज, 1 जूनला पहाटे तीन ते चारच्या सुमारास घडली. विनोद रमेश हरकळ यांचा हा बार आहे. चोरट्यांनी बारची खिडकी तोडून आतमध्ये शिरत विदेशी दारू लंपास केली. हरकळ …
 

किनगाव राजा (नीलेश डिघोळे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः किनगाव राजा बसस्‍थानकाजवळील विनोद वाईन बार फोडून चोरट्यांनी 68 हजार 179 रुपयांची विदेशी दारू लंपास केली आहे. ही घटना आज, 1 जूनला पहाटे तीन ते चारच्‍या सुमारास घडली.

विनोद रमेश हरकळ यांचा हा बार आहे. चोरट्यांनी बारची खिडकी तोडून आतमध्ये शिरत विदेशी दारू लंपास केली. हरकळ यांनी किनगाव राजा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. 24 मेच्या सकाळी किनगाव राजा परिसरातील प्रतीक वाईन बार फोडून चोरट्यांनी ६ लाख ८४ हजार ७८३ रुपयांची दारू लंपास केली होती. अवघ्या 7 दिवसांत दोन बार चोरट्यांनी लक्ष्य केल्याने किनगाव राजाच्‍या चोरटे चांगलेच मद्यप्रेमी दिसतात, अशी चर्चा गावात चवीने सुरू आहे. तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राजू दराडे करत आहेत.