पूरग्रस्‍तांसाठी चारचौघांचे सरसावले हात!; जिल्हाधिकारी म्हणाले, तुमचा अभिमान!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पश्चिम महाराष्ट्रात निसर्गाचा मोठा प्रकोप झाला. महापुराने व दरड कोसळल्याने अनेक नागरिकांचा जीव गेला. प्रशासन त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न करत असले तरी निसर्ग प्रकोपाने त्रस्त झालेल्या बांधवांसाठी आपणही मदत केली पाहिजे या हेतूने चिखलीतल्या चार तरुण विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ११ हजार रुपयांची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. पूरग्रस्त भागासाठी जिल्ह्यातून जाणारी ही …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पश्चिम महाराष्ट्रात निसर्गाचा मोठा प्रकोप झाला. महापुराने व दरड कोसळल्याने अनेक नागरिकांचा जीव गेला. प्रशासन त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न करत असले तरी निसर्ग प्रकोपाने त्रस्त झालेल्या बांधवांसाठी आपणही मदत केली पाहिजे या हेतूने चिखलीतल्या चार तरुण विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ११ हजार रुपयांची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. पूरग्रस्त भागासाठी जिल्ह्यातून जाणारी ही पहिलीच मदत ठरली. तुमचा अभिमान वाटतो, अशा शब्‍दांत जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. चिखली शहरात स्पर्धा परीक्षेची तयार करीत असलेले विनोद इंगळे, विष्णू आव्हाळे, अमोल इंगळे, मुकेश राजपूत या चार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ११ हजार रुपये जमा केले. ते काल, २६ जुलैला प्रशासनाकडे दिले.