पेट्रोलपंपावर दुचाकीला आग लागल्‍याने उडाला गोंधळ!; शेगाव येथील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुचाकीत पेट्रोल टाकले. तितक्यात पेट्रोलला गळती लागली, त्याचवेळी स्पार्किंग होऊन गाडीने पेट घेतला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. गाडी तातडीने पंपापासून दूर नेत विझविण्यात आली. ही घटना शेगावच्या केवलराम पेट्रोल पंपावर आज, 19 मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. कालखेडचे रहिवासी असलेले ऋषिकेश …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दुचाकीत पेट्रोल टाकले. तितक्‍यात पेट्रोलला गळती लागली, त्‍याचवेळी स्‍पार्किंग होऊन गाडीने पेट घेतला. त्‍यामुळे एकच गोंधळ उडाला. गाडी तातडीने पंपापासून दूर नेत विझविण्यात आली. ही घटना शेगावच्या केवलराम पेट्रोल पंपावर आज, 19 मे रोजी दुपारी साडेबाराच्‍या सुमारास घडली. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.

कालखेडचे रहिवासी असलेले ऋषिकेश गुरव (हल्ली मुक्काम निमकवडा) हे त्यांच्या आईची तब्येत खराब असल्याने भेंडवळ येथून बहिणीला व त्यांच्या भाचीला घेऊन मोटार सायकलने निमकवडा येथे जात होते. शेगावच्या केवलराम पेट्रोल पंपावर त्यांनी १०० रुपयांचे पेट्रोल टाकले. मोटारसायकल पेट्रोलपंपासमोर उभी केली. यावेळी मोटारसायकलमधून पेट्रोल गळती झाल्याने तसेच वायरिंगच्या स्पार्किंगमुळे अचानक  मोटार सायकलने पेट घेतला, असे ऋषिकेश गुरव यांनी सांगितले. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी आग आटोक्यात आणली. मात्र अचानक घडलेल्या घटनेमुळे पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांसह नागरिकांची एकच धावपळ उडाली. आग आटोक्यात आणण्यासाठी पेट्रोल पंपावरील कर्मचारी गजानन चिलात्रे, आनंद बढे, प्रफुल्ल आढाव, गजानन शेट्टे यांनी पुढाकार घेतला.