पेनटाकळीच्‍या महिलेचा कोरोनाने मृत्‍यू; नव्या १८ बाधितांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्याच्या स्त्री रुग्णालयात उपचार घेतलेल्या पेनटाकळी (ता. मेहकर) येथील 90 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. नव्या 18 पॉझिटिव्ह रुग्णांची आज, 21 जून रोजी भर पडली असून, सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या 110 आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1019 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी …
 
पेनटाकळीच्‍या महिलेचा कोरोनाने मृत्‍यू; नव्या १८ बाधितांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाण्याच्‍या स्त्री रुग्णालयात उपचार घेतलेल्या पेनटाकळी (ता. मेहकर) येथील 90 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्‍यू झाला आहे. नव्या 18 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची आज, 21 जून रोजी भर पडली असून, सध्या रुग्‍णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या 110 आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1019 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1001 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 13 व रॅपीड टेस्टमधील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्‍ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 253 तर रॅपिड टेस्टमधील 748 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1001 अहवाल निगेटिव्ह आहेत.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
संग्रामपूर तालुका : दुर्गादैत्य 1, खामगाव शहर : 1, खामगाव तालुका : टेंभूर्णा 1, पिंपळगाव राजा 1, मेहकर तालुका : वरोडी 1, जळगाव जामोद तालुका : वडगाव गड 1, पळसखेड 1, धानोरा 1, बुलडाणा शहर : 4, लोणार शहर : 1, मलकापूर शहर : 1, देऊळगाव राजा शहर : 1, देऊळगाव राजा तालुका : जांभोरा 1, नांदुरा तालुका : दादगाव 1, परजिल्हा रिसोड 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 18 रुग्ण आढळले आहे.

41 रुग्णांचा डिस्‍चार्ज
आज 41 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 549386 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85529 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1152 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 549386 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 86293 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 110 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 654 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.