पेनटाकळी धरणात शेतकरी बसले उपोषणाला!

मेहकर (विष्णू आखरे पाटील) ः पेनटाकळी कॅनॉलचे पाणी पाईपलाईनद्वारे सोडावे, या मागणीसाठी पेनटाकळी धरणात शेतकरी बांधवांनी 5 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज, 6 फेब्रुवारीलाही उपोषण सुरू होते.पेनटाकळी प्रकल्पाचे काम 1990 च्या दशकात करण्यात आले. तेव्हापासून हा कॅनॉल वादग्रस्त ठरत आला आहे. या कॅनॉलचे पाणी शेतात पाझरून दरवर्षी लाखो रूपयांचे नुकसान होत असते. त्यामुळे …
 

मेहकर (विष्णू आखरे पाटील) ः पेनटाकळी कॅनॉलचे पाणी पाईपलाईनद्वारे सोडावे, या मागणीसाठी पेनटाकळी धरणात शेतकरी बांधवांनी 5 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज, 6 फेब्रुवारीलाही उपोषण सुरू होते.
पेनटाकळी प्रकल्पाचे काम 1990 च्या दशकात करण्यात आले. तेव्हापासून हा कॅनॉल वादग्रस्त ठरत आला आहे. या कॅनॉलचे पाणी शेतात पाझरून दरवर्षी लाखो रूपयांचे नुकसान होत असते. त्यामुळे धरणापासून 11 किलोमीटरपर्यंत प्रकल्पाचे पाणी पाईपलाईनद्वारे नेण्यात यावे अन्यथा आम्ही धरणाच्या पाण्यात बसून 5 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करू, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला होता. उपविभागीय अधिकार्‍यांनी निवेदनाची दखल न घेतल्याचा आरोप करत शेतकरी धरणाच्या पाण्यात उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्त्यांत शालीकराम काळे, दत्ता काळे, एकनाथ सास्ते, परमेश्‍वर धांडे, बबन महाराज, संजय वाहेकर आदींचा समावेश आहे.