पेनटाकळी प्रकल्पाच्या 416 कोटी रुपयांच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय प्रस्तावास मान्यता; आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्‍नांना यश

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेनटाकळी प्रकल्पातील बाधित गावांच्या पुनर्वसनासाठी अनेक वर्षांपासून रखडलेल्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास त्री सदस्यीय कमिटीने तत्वतः मान्यता दिल्याने घनमोड , मानमोड, पांढरदेव या गावांच्या पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना फार मोठे यश आल्याचे मानले जात आहे. 12 फेब्रुवारी 2021 रोजी याबाबत उच्चस्तरीय …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पेनटाकळी प्रकल्पातील बाधित गावांच्या पुनर्वसनासाठी अनेक वर्षांपासून रखडलेल्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास त्री सदस्यीय कमिटीने तत्वतः मान्यता दिल्याने घनमोड , मानमोड, पांढरदेव या गावांच्या पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्‍नांना फार मोठे यश आल्‍याचे मानले जात आहे.

12 फेब्रुवारी 2021 रोजी याबाबत उच्चस्तरीय सचिवांच्या त्री सदस्यीय कमिटीच्या झालेल्या बैठकीत पेनटाकळी प्रकल्पातीतील पश्चजलाने बाधित होणाऱ्या घानमोड , मानमोड , पांढरदेव या गावांचे पुनर्वसन व अन्य कामे केली जाणार आहेत. देवदरी हे गाव ही अंशतः बाधित होते. त्यासाठी नव्याने प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. पेनटाकळी प्रकल्पाची एकूण किंमत 416 कोटी रुपये असून, त्यापैकी 263 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. 153 कोटी रुपयांची कामे शिल्लक असून, त्यासाठी ‘सुप्रमा’ आवश्यक होती . आता ‘सुप्रमा’ मिळाल्याने 111 कोटी रुपये भूसंपादन , 18 कोटी रुपये मेन कॅनॉलवर तर 18 कोटी रुपये वितरीकेवर खर्च होणार आहेत. तसेच केटी वेअर , गजरखेड फाटा ते कासारखेड , देवदरी ते भोरसाभोरसी या रस्त्यांची कामेही होणार आहे . याबाबत आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी आमदार होताच या गावांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.