पैनगंगेला पूर; येळगाव धरणात समाधानकारक जलसाठा!!

ठाण्याच्या मनपा सहाय्यक आयुक्तांसह बॉडीगार्डवर प्राणघातक हल्ल्याचे बुलडाण्यात पडसाद बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आजवर कमी पावसाची नोंद झाल्याने वरुणराजाची आतुर प्रतीक्षा असलेल्या बुलडाणा तालुक्यात अखेर दमदार पावसाने हजेरी लावलीय! यामुळे जीवनदायिनी असलेल्या पैनगंगा नदीला पूर गेला असून, दुथडी वाहणाऱ्या या नदीचे पाणी सागवान गावाजीकच्या पुलाखालून जोमाने वाहत असल्याचे सुखद दृश्य हजारो …
 
पैनगंगेला पूर; येळगाव धरणात समाधानकारक जलसाठा!!

ठाण्याच्‍या मनपा सहाय्यक आयुक्तांसह बॉडीगार्डवर प्राणघातक हल्ल्याचे बुलडाण्यात पडसाद

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आजवर कमी पावसाची नोंद झाल्याने वरुणराजाची आतुर प्रतीक्षा असलेल्या बुलडाणा तालुक्यात अखेर दमदार पावसाने हजेरी लावलीय! यामुळे जीवनदायिनी असलेल्या पैनगंगा नदीला पूर गेला असून, दुथडी वाहणाऱ्या या नदीचे पाणी सागवान गावाजीकच्या पुलाखालून जोमाने वाहत असल्याचे सुखद दृश्य हजारो नागरिकांनी डोळे भरून पाहिले!

आज, ३१ ऑगस्‍टला सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या गत्‌ 24 तासांत बुलडाणा तालुक्यात 32.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याच नदीवर पुढे येळगाव येथे असलेल्या धरणात यामुळे समाधानकारक जलसाठा झाला आहे. व्यापक अंदाजानुसार धरणात किमान 3 महिने पुरेल इतका साठा झाला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात बुलडाणा तालुक्यावर वरुणराजाची अवकृपा राहिली आहे. 31 ऑगस्टअखेर तालुक्यात केवळ 58 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरी 860 मिलिमीटरच्या तुलनेत आजअखेर तालुक्यात केवळ 498 मि.मी. इतक्याच पावसाची नोंद झाली आहे. यामुळे अजूनही प्रतीक्षा व आवश्यकता असली तरी या पावसाने दीडेक लाख शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील मंडळनिहाय पाऊस (मि.मी.मध्ये)
धाड : 55.8 मि.मी.
म्हसला : 57 मि.मी.
देऊळघाट : 48 मि.मी.
बुलडाणा : 10.8 मि.मी.
रायपूर :
17.5 मि.मी.
पाडळी : 28 मि.मी.
सावळा : 8 मि.मी.