पैशांसाठी विवाहितेला घराबाहेर हाकलले!; पतीसह तिघांविरुद्ध; खामगाव शहरातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तुझ्या वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत २१ वर्षीय विवाहितेला घरातून हाकलण्यात आले. ही घटना खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात समोर आली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी फरहाना परवीन कलीम पटेल (२१, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तुझ्या वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत २१ वर्षीय विवाहितेला घरातून हाकलण्यात आले. ही घटना खामगाव शहरातील बर्डे प्‍लॉट भागात समोर आली आहे. विवाहितेच्‍या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

या प्रकरणी फरहाना परवीन कलीम पटेल (२१, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) हिने तक्रार दिली. पती व सासरची मंडळी तिला तिच्या वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत होते. यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. पती व सासूने मारहाण केली आणि घराबाहेर काढले. त्यामुळे फरहाना ही तिच्या वडिलांकडेच राहत होती. ८ जुलैला तिने शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिल्याने पोलिसांनी पती कलीम पटेल जुम्मा पटेल, सासू नजमाबी जुम्मा पटेल व जुम्मा पटेल (रा. बर्डे प्लॉट, खामगाव) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक श्री. सातव करत आहेत.