पॉझिटिव्हचा आलेख घसरला… पण बळींची मालिका कायम! बुलडाणा, खामगावमध्ये कोरोना बळींचे शतक!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागील काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख घसरला असला तरी मृत्यूची मालिका कायम असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील बळींचा आकडा साडेसहाशेच्या दिशेने वाटचाल करत असून, बुलडाणा व खामगाव तालुक्यांनी शतकाचा आकडा कधीच ओलांडला असल्याचे धक्कादायक चित्र आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा झपाट्याने कमी झाला आहे. …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मागील काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांचा आलेख घसरला असला तरी मृत्यूची मालिका कायम असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील बळींचा आकडा साडेसहाशेच्या दिशेने वाटचाल करत असून, बुलडाणा व खामगाव तालुक्यांनी शतकाचा आकडा कधीच ओलांडला असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा झपाट्याने कमी झाला आहे. तब्बल 2 महिन्यांनंतर 2 आकड्यांत रुग्ण येताहेत. मात्र मृत्यूची मालिका अविरत सुरूच आहे. रोज किमान दोघा- तिघांचा मृत्यू होत आहे. 4 जूनपर्यंत हा आकडा 626 वर पोहोचला होता. यातही अर्थात बुलडाणा तालुका आघाडीवर असून, बळींची संख्या 135 इतकी आहे. दुसऱ्या क्रमांकावरील खामगाव तालुक्यातील संख्या 107 असून, चिखली तालुक्यातील बळींची संख्या पाऊणशेच्या घरात (71) पोहोचली आहे.

मेहकर व मलकापूरमध्ये 50 जणांनी कोरोनामुळे जीव गमावलाय. यापाठोपाठ नांदुरा 42, मोताळा 32, जळगाव 24, सिंदखेड राजा 25, शेगाव 17, लोणार 16, देऊळगाव राजा 15, संग्रामपूर 6 असा तालुकानिहाय क्रम आहे. इतर जिल्ह्यांतील रहिवासी परंतु बुलडाणा जिल्ह्यात उपचारादरम्यान दगवलेल्या व्यक्तींची संख्या 36 इतकी आहे.पॉझिटिव्हचा आलेख घसरला… पण बळींची मालिका कायम! बुलडाणा, खामगावमध्ये कोरोना बळींचे शतक!!