पोटच्या अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍यास आजन्म कारावास; मेहकरच्या न्यायालयाचा निकाल

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोटच्या अपंग मुलीवर सतत लैंगिक अत्याचार करणार्या नराधमास मेहकर सत्र न्यायालयाने आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे ही घटना समोर आली होती. 16 वर्षीय बालिकेवर दारूडा बाप वारंवार अत्याचार करत होता. कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता. 20 सप्टेंबर 2012 लाही त्याने अत्याचार केला असता …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोटच्या अपंग मुलीवर सतत लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमास मेहकर सत्र न्यायालयाने आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे ही घटना समोर आली होती.

16 वर्षीय बालिकेवर दारूडा बाप वारंवार अत्याचार करत होता. कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता. 20 सप्टेंबर 2012 लाही त्याने अत्याचार केला असता पीडितेने हा प्रकार बहिणीला सांगितला. त्यानंतर काकासोबत डोणगाव पोलीस ठाण्यात येऊन तिने तक्रार नोंदवली. पोलिसांनी पित्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. तपास पीएसआय व्ही. डी. मुंडे यांनी करून सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यात एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. पुरावे सिद्ध झाल्याने पित्याला आजन्म कारावासाची शिक्षा, 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा 2 वर्षांची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. खोंगल यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जे. एम. बोदडे यांनी काम पाहिले. मेहकर येथे जिल्हा सत्र न्यायालय सुरू झाल्यापासून पोक्सो कायद्याअंतर्गत दिली गेलेली ही सर्वांत मोठी शिक्षा ठरली आहे. (बातमीत पीडितेची ओळख स्पष्ट होईल म्हणून जाणूनबुजून आरोपीचे नाव टाळले आहे.)