पोटाच्‍या आजाराला कंटाळून घरातच घेतला गळफास; शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्यातील आडसूळ येथे ५२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराच्या बल्लीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १६ ऑगस्ट रोजी दुपारी तीनला समोर आली. हरिदास तोताराम पातळे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. हरिदास यांचे चुलतभाऊ शिवशंकर महादेव पातळे यांनी घटनेची माहिती शेगाव ग्रामीण पोलिसांना दिली. पोटाच्या …
 
पोटाच्‍या आजाराला कंटाळून घरातच घेतला गळफास; शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्‍यातील आडसूळ येथे ५२ वर्षीय व्‍यक्‍तीने राहत्या घराच्या बल्लीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १६ ऑगस्ट रोजी दुपारी तीनला समोर आली. हरिदास तोताराम पातळे असे आत्‍महत्‍या करणाऱ्या व्‍यक्‍तीचे नाव आहे. हरिदास यांचे चुलतभाऊ शिवशंकर महादेव पातळे यांनी घटनेची माहिती शेगाव ग्रामीण पोलिसांना दिली. पोटाच्या आजाराला कंटाळून हरिदास यांनी गळफास घेतल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली. तपास ठाणेदार गोकूळ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल धनराज माने करीत आहेत.