पोलिसांच्‍या आरोग्‍यासाठी ‘योगा’मंत्र; आजपासून 10 मेपर्यंत ऑनलाइन शिबिर, सकाळीच उद्‌घाटन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे सध्या सर्वांत जास्त मानसिक आणि शारीरिक त्रासाला कुणी सामोरे जात असेल तर ते पोलीस बांधव. कडक निर्बंधांची अंमलबजावणी करताना रस्त्यावर राहणाऱ्या पोलिसांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य जपण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे ‘योग’मंत्र पुढील 5 दिवस दिला जाणार आहे. आज, 5 मे रोजी या ऑनलाइन योगा शिबिराची सुरुवात करण्यात आली. कर्तव्यदक्ष …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  कोरोनामुळे सध्या सर्वांत जास्‍त मानसिक आणि शारीरिक त्रासाला कुणी सामोरे जात असेल तर ते पोलीस बांधव. कडक निर्बंधांची अंमलबजावणी करताना रस्‍त्‍यावर राहणाऱ्या पोलिसांचे आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांचे आरोग्‍य जपण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे ‘योग’मंत्र पुढील 5 दिवस दिला जाणार आहे. आज, 5 मे रोजी या ऑनलाइन योगा शिबिराची सुरुवात करण्यात आली.

कर्तव्‍यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांचे प्रेरणेतून, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून हे शिबिर सुरू झाले आहे. योग प्रशिक्षक प्रा. डॉ. बाबाराव सांगळे योगाचे धडे देणार आहेत. सकाळी 6 ते 07:30 दरम्‍यान पोलीस मुख्यालयाच्‍या प्रेरणा सभागृहातून योगा शिबिर ‘लाइव्‍ह’ होईल. शिबिराचे उदघाटन अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्‍या हस्ते आज सकाळी झाले. शिबिरात जास्‍तीत जास्‍त पोलीस बांधवांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. चावरिया यांनी केले आहे, अशी माहिती स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांनी बुलडाणा लाइव्‍हला दिली.