पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांचे आवाहन… आरोग्‍याची काळजी घेत गणेशोत्‍सव साध्या पद्धतीने साजरा करा!

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दीड वर्षात कोरोनामुळे सर्वच सण, उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे लागले. आताही तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून काही बंधने स्वतःला घालून घेण्याची गरज असून, गणेशोत्सवही आरोग्याची काळजी घेत साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी जळगाव जामोदमध्ये केले. काल, ३ ऑगस्टला नगरपरिषदेच्या सांस्कृतिक …
 
पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांचे आवाहन… आरोग्‍याची काळजी घेत गणेशोत्‍सव साध्या पद्धतीने साजरा करा!

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दीड वर्षात कोरोनामुळे सर्वच सण, उत्‍सव साध्या पद्धतीने साजरे करावे लागले. आताही तिसऱ्या लाटेची शक्‍यता गृहित धरून काही बंधने स्वतःला घालून घेण्याची गरज असून, गणेशोत्‍सवही आरोग्‍याची काळजी घेत साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी जळगाव जामोदमध्ये केले.

काल, ३ ऑगस्‍टला नगरपरिषदेच्‍या सांस्‍कृतिक भवनात शांतता समितीची बैठक घेण्यात आली, त्‍यावेळी ते बोलत होते. ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी प्रास्‍ताविक केले. सुरक्षित अंतर, सॅनिटायझर आणि मास्‍कचा वापर या त्रिसूत्रीचा अंगिकार करण्याचे आवाहन त्‍यांनी केले. उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनीही मार्गदर्शन केले. अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, तहसीलदार शीतल सोलाट, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसेनजीत पाटील, अनिल जयस्वाल, तुकाराम काळपांडे, नाना कांडलकर, अ. गफ्फार मुल्ला यांच्‍यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्‍थित होते.