पोलीस अधीक्षक म्‍हणतात… नियम आपल्या भल्यासाठी; धार्मिक स्वातंत्र्यावर गदा नाही!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनाने घालून दिलेले नियम समाजाच्या व देशाच्या भल्याचे आहेत. नियमांचे पालन करून सण, उत्सव साजरे केले तर कोरोनाचा उद्रेक थांबवता येईल. शासनाचे नियम हे कुठल्या धर्माच्या विरोधात नाहीत. धार्मिक स्वातंत्र्यावर गदा नाही. तसा अपप्रचार सुद्धा करू नये, असे प्रतिपादन कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केले. बुलडाणा शहर पोलीस …
 
पोलीस अधीक्षक म्‍हणतात… नियम आपल्या भल्यासाठी; धार्मिक स्वातंत्र्यावर गदा नाही!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनाने घालून दिलेले नियम समाजाच्या व देशाच्या भल्याचे आहेत. नियमांचे पालन करून सण, उत्सव साजरे केले तर कोरोनाचा उद्रेक थांबवता येईल. शासनाचे नियम हे कुठल्या धर्माच्या विरोधात नाहीत. धार्मिक स्वातंत्र्यावर गदा नाही. तसा अपप्रचार सुद्धा करू नये, असे प्रतिपादन कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केले. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आज, ४ सप्टेंबर रोजी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्‍यावेळी ते बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. नियम तयार करताना केंद्राच्या सूचना, राज्यातील टास्क फोर्सच्या सूचना, तज्‍ज्ञ डॉक्टरांच्या सूचना विचारात घेतल्या जातात. सध्या केरळ राज्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. मागील दोन लाटांचा अनुभव बघता केरळनंतर महाराष्ट्रात कोरोना उद्रेक सुरू होतो असा अनुभव आहे. त्यामुळे स्वतःचे, समाजाचे, देशाचे आरोग्य जपण्याची जबाबदारी आपली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आवश्यक त्या नियमांचे काटेकोर पालन करून सण- उत्सव साजरे करावे, असे श्री. चावरिया म्हणाले.

पोलीस अधीक्षक म्‍हणतात… नियम आपल्या भल्यासाठी; धार्मिक स्वातंत्र्यावर गदा नाही!

आमदार संजय गायकवाड म्हणाले, की कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये खूप वाईट अनुभव आले. एका दिवसात रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन, बेड यासाठी ४०० ते ५०० फोन यायचे. परिस्थिमुळे सर्वांना मदत करणे शक्यच नव्हते. सर्वच हतबल झाले होते. सख्ख्या नातेवाइकांचा अंत्यविधी करायला कुणी तयार नव्हते. येणारी तिसरी लाट ही त्यापेक्षा घातक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी येणारे सण, उत्सव साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन त्‍यांनी केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंखे, मोहम्मद सज्जाद, शहरातील नगरसेवक, गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.