विशेष पोलिस महानिरीक्षक मीना बुलडाण्यात दाखल; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ःअमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना आज, 6 एप्रिलला बुलडाण्यात आले आहेत. सकाळीच त्यांचा ताफा आला. यामुळे शहरासह बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचे चित्र आहे. कोरोना संकट, जिल्ह्यातील गुन्हेगारी, पोलीस दलातील लाचखोरी, सैलानी येथे उसळलेली गर्दी या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षकांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. कोविड …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ःअमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना आज, 6 एप्रिलला बुलडाण्यात आले आहेत. सकाळीच त्यांचा ताफा आला. यामुळे शहरासह बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचे चित्र आहे.

कोरोना संकट, जिल्ह्यातील गुन्हेगारी, पोलीस दलातील लाचखोरी, सैलानी येथे उसळलेली गर्दी या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षकांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. कोविड संकट असल्यामुळे निवडक अधिकाऱ्यांसोबत ते जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याचे समजते. त्यासाठी जिल्ह्यातील विविध शाखांचे प्रमुख आणि निवडक ठाणेदार सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. विशेष पोलिस महानिरीक्षकांच्‍या या दौऱ्यामुळे जिल्हा पोलीस दल अलर्ट मोडवर आहे. कोणत्याही क्षणी विशेष पोलिस महानिरीक्षक एखाद्या पोलीस ठाण्यात भेट देऊ शकतील म्हणून कर्मचारी गणवेशात दिसत आहेत. शहरातील विविध चौकांत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.