पोलीस चालक भरतीच्या मैदानी चाचणीचा निकाल जाहीर; आक्षेप नोंदविण्यासाठी ४८ तास!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा पोलीस दलातील चालक पोलीस पदाच्या ६० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत वाहन चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली होती. चाचणीची गुणतालिका आज, १६ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. ही गुणतालिका पोलीस मुख्यालयातील जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष आणि प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात …
 
पोलीस चालक भरतीच्या मैदानी चाचणीचा निकाल जाहीर; आक्षेप नोंदविण्यासाठी ४८ तास!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा पोलीस दलातील चालक पोलीस पदाच्या ६० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत वाहन चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली होती. चाचणीची गुणतालिका आज, १६ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. ही गुणतालिका पोलीस मुख्यालयातील जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष आणि प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात आली आहे. निकालावर ज्या उमेदवारांना आक्षेप असेल त्यांनी ४८ तासांच्या आत पोलीस नियंत्रण कक्ष येथे येऊन लेखी स्वरुपात आक्षेपात नोंदवावा. याशिवाय query.buldhanapolice@gmail.com या ई- मेल आयडीवरसुद्धा आक्षेप नोंदवता येईल. आक्षेप घेण्याची मुदत संपल्यानंतर आलेले आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी कळविले आहे.