पोलीस लिहिलेली कार बाजूला लावून ASI विजय पवारचा मित्रांसह दारू पिऊन रस्‍त्‍यात धिंगाणा; आ. गायकवाडांनी कानशिलात लगावून उतरवली नशा!; देऊळगाव राजा पोलिसांनी कार जप्‍त करून केली अटकेची कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोलीस लिहिलेली पाटी असलेली कार बाजूला उभी करून ऐन रस्त्यात धिंगाणा घालत “डान्स’ करणाऱ्या बिबी पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस उपनिरिक्षक विजय पवार याला अटक केली. त्याचा अहवाल कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी मागवला आहे. रस्त्यात हा पोलीस कर्मचारी आणि त्याचे मित्र दारू पिऊन धिंगाणा घालत असताना मोठ्या प्रमाणावर …
 
पोलीस लिहिलेली कार बाजूला लावून ASI विजय पवारचा मित्रांसह दारू पिऊन रस्‍त्‍यात धिंगाणा; आ. गायकवाडांनी कानशिलात लगावून उतरवली नशा!; देऊळगाव राजा पोलिसांनी कार जप्‍त करून केली अटकेची कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोलीस लिहिलेली पाटी असलेली कार बाजूला उभी करून ऐन रस्त्यात धिंगाणा घालत “डान्‍स’ करणाऱ्या बिबी पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस उपनिरिक्षक विजय पवार याला अटक केली. त्‍याचा अहवाल कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी मागवला आहे. रस्‍त्‍यात हा पोलीस कर्मचारी आणि त्‍याचे मित्र दारू पिऊन धिंगाणा घालत असताना मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली होती. सुमारे २५ मिनिटे हा प्रकार सुरू होता. याचवेळी या रस्‍त्‍याने बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड जात होते. त्‍यांचा संताप अनावर होऊन त्‍यांनी या पोलीस कर्मचाऱ्याच्‍या कानशिलात लगावली. त्‍यानंतर भानावर आलेल्या या कर्मचाऱ्याने मित्रांसह कारमधून पळ काढला. ही घटना काल, ५ सप्‍टेंबरच्‍या सायंकाळी सहाच्‍या सुमारास देऊळगाव महीजवळील सरंबा फाट्यावर घडली.

पोलीस लिहिलेली कार बाजूला लावून ASI विजय पवारचा मित्रांसह दारू पिऊन रस्‍त्‍यात धिंगाणा; आ. गायकवाडांनी कानशिलात लगावून उतरवली नशा!; देऊळगाव राजा पोलिसांनी कार जप्‍त करून केली अटकेची कारवाई

विजय पवार याच्‍याविरुद्ध रहदारीस अडथळा निर्माण केल्याचा गुन्‍हा दाखल करून कारही देऊळगाव राजा पोलिसांनी जप्‍त केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. त्यांना भेटून आमदार गायकवाड बुलडाणा येथे परतत होते. देऊळगाव राजा- चिखली रस्त्यावरील सरंबा फाट्याजवळ त्यांना वाहतूक खोळंबलेली दिसली. त्यामुळे त्यांनी समोर जाऊन बघितले असता पोलीस लिहिलेली पांढरी कार (क्रमांक एमएच २८ एन ३६४१ ) रस्त्याच्या कडेला उभे करून तिघे जण मद्यधुंद अवस्थेत डान्स करत होते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आमदार गायकवाड यांनी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता नशेत असल्याने त्यांना काहीच बोलता येत नव्‍हते. त्यामुळे आमदार गायकवाड यांनी तिघांच्याही कानशिलात लगावली.

त्यामुळे मद्यधुंद तिघांचा डान्स बंद झाला. लगेच कारमध्ये बसून तिघेही पसार झाले. हा प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याही कानावर घातल्याचे आ. गायकवाड यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. दारू पिऊन रस्‍त्‍यात धिंगाणा घालणारा कर्मचारी बिबी पोलीस ठाण्याचा एएसआय विजय पवार असल्याचे समोर आले. त्‍यानंतर देऊळगाव राजा पोलिसांनी तातडीने पवारला ताब्‍यात घेतले. त्‍याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला व कार जप्‍त केली. या संपूर्ण घटनेचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मागवला आहे.