पोलीस, होमगार्डना फेब्रुवारीपासून मिळणार लस!

मुंबई (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः कोरोना काळात रुग्णांना उपचार देणार्या डॉक्टरांशिवाय काम करणार्या फ्रंटलाइन वर्कर्सला लसीकरणासाठी नावनोंदणीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. या फ्रंटलाइन वर्कर्सला फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्या आठवड्यात लसीकरण केले जाण्याची शक्यता आहे.सध्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचार्यांना लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, लशींचा पुरवठा सुरळीत होण्याचे नियोजन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. राज्यात फ्रंटलाइन …
 

मुंबई (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः कोरोना काळात रुग्णांना उपचार देणार्‍या डॉक्टरांशिवाय काम करणार्‍या फ्रंटलाइन वर्कर्सला लसीकरणासाठी नावनोंदणीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. या फ्रंटलाइन वर्कर्सला फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात लसीकरण केले जाण्याची शक्यता आहे.
सध्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, लशींचा पुरवठा सुरळीत होण्याचे नियोजन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. राज्यात फ्रंटलाइन वर्कर्समध्ये पोलीस, लष्करी दलाचे अधिकारी, जवान, होमगार्ड्स, पॅरामेडिकल स्टाफ आदींचा समावेश आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याला दिले आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात लसीकरण करण्यास सुरुवात करण्याचे संकेत केंद्राने दिले आहेत. केंद्र सरकारने राज्याला दिलेल्या कोव्हिशील्ड लशीची मुदत मे महिन्यापर्यंत आहे. त्यामुळे त्यापूर्वीच फ्रंटलाइन तसेच आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केंद्राने आरोग्य खात्याला दिल्या आहेत. फ्रंटलाइन वर्कर्सला को विन अ‍ॅपवर 25 जानेवारीपर्यंत नोंदणीची मुदत होती. मात्र, त्याला येत्या 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.